दिग्गजांच्या अनुपस्तिथीत मुंबईला हरवून सौराष्ट्रने घडवला इतिहास

saurashtra team
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन – रणजी ट्रॉफीत सौराष्ट्रने (saurashtra) मुंबईला पराभूत करून मोठा इतिहास रचला आहे. आतापर्यंत रणजी ट्रॉफीत सौराष्ट्र आणि मुंबई यांच्यात 59 सामने झाले. मात्र यामध्ये एकाही सामन्यात सौराष्ट्रला (saurashtra) मुंबईवर विजय मिळवता आला नव्हता. मुंबईच्या संघाला मुंबईतच बांद्रा कुर्ला कॉम्प्लेक्सवर झालेल्या सामन्यात हरवून सौराष्ट्रच्या संघाने इतिहास रचला आहे. या सामन्यात धर्मेंद्र सिंह जडेजाला सामनावीर पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. त्याने या सामन्यात 114 धावा केल्या आणि 6 गडी बाद केले.

कालच्या सामन्यात मुंबईकडून सूर्यकुमार यादव, अजिंक्य रहाणे, सरफराज खान, पृथ्वी शॉ, यशस्वी जयस्वाल यांच्यासारखे खेळाडू खेळत होते. तर सौराष्ट्रचे दिग्गज प्लेअर्स चेतेश्वर पुजारा, जयदेव उनादकट हे संघात नसतानादेखील सौराष्ट्रच्या संघाने मुंबईला हरवून इतिहास रचला आहे. या सामन्यात नाणेफेक जिंकून सौराष्ट्रने (saurashtra) फलंदाजीचा निर्णय घेतला. कर्णधार अर्पित वसवदा याच्या 75 धावांच्या जोरावर सौराष्ट्रने पहिल्या डावात 289 धावा केल्या. तर मुंबईचा अष्टपैलू क्रिकेटर शम्स मुलानीने 4 विकेट घेतल्या. यानंतर मुंबईच्या संघाने सूर्यकुमार यादव 95 तर सरफराज खान 75 धावा यांच्या जोरावर 230 धावांपर्यंत मजल मारली.

सौराष्ट्रचा मुंबईविरुद्ध पहिलाच विजय
रणजी ट्रॉफीत आतापर्यंत मुंबईविरुद्ध सर्वाधिक विजय बडोदा, गुजरात आणि कर्नाटकच्या संघाने मिळवले आहेत. तिन्ही संघांनी मुंबईविरुद्ध प्रत्येकी चार सामने जिंकले आहेत. तर महाराष्ट्र्, तामिळनाडुच्या संघाने प्रत्येकी तीन वेळा मुंबईवर विजय मिळवला आहे. तसेच हरयाणा, उत्तर प्रदेश, पंजाबच्या संघाला फक्त 2 वेळा मुंबईवर विजय मिळवता आला आहे. तर रणजी ट्रॉफीत नवानगर, होलकर, दिल्ली, हैदराबाद, जम्मू आणि काश्मीर, विदर्भ, रेल्वे, मध्य प्रदेश आणि सौराष्ट्रच्या (saurashtra) संघाला मुंबईविरुद्ध फक्त एकदाच विजय मिळवता आला आहे.

हे पण वाचा :
संजय राऊत होणार भारत जोडो यात्रेत सहभागी; घेणार राहुल गांधींची भेट
सुप्रिया सुळेंकडून शिंदे गटातील आमदाराचे कौतुक; ट्वीट करत म्हणाल्या…
ठाकरे गटाचे आणखी 3 खासदार आणि 8 आमदार शिंदेंच्या संपर्कात, ‘या’ खासदाराचा मोठा दावा
50 आमदारांच्या गुवाहाटी दौऱ्याची तारीख ठरली !; ‘या’ दिवशी जाणार कामाख्या देवीच्या दर्शनाला
भगतसिंग कोश्यारी यांच्या ‘त्या’ वक्तव्यावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची प्रतिक्रिया; म्हणाले…..