रामराजे बिन लग्नाची औलाद ; रणजितसिंहांची जहरी टीका

1
82
Untitled design
Untitled design
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

फलटण प्रतिनिधी |माढा मतदारसंघातून राष्ट्रवादीचा ऐतिहासिक पराभव करून निवडून आलेले रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी विधान परिषदेचे सभापती रामराजे नाईक निंबाळकर यांच्यावर जहरी टीका केली आहे. माझा डीएनए तपासा माझ्या सगळ्या पिढ्या नाईक निंबाळकरांच्या असल्याचे समजून येईल मात्र रामराजेंचे तसे होणार नाही असा सणसणित टोला रणजितसिंहांनी रामराजेंना लगावला आहे.

कंडोमच्या वापरा संदर्भात तुम्हाला हि माहिती आहे का?

मी ओरिजनल नाईक निंबाळकर आहे. माझ्या ९६ पिढ्या ह्या नाईक निंबाळकरांच्या निघतील. पण रामराजे तुमचं काय. तुमच्या आईचे आणि वडिलांचे लग्न जरी झाले होते का? आणि जर लग्न झाले होते तर कोणीही मला त्यांच्या लग्नाचा पुरावा आणून द्यावा त्याला मी १ हजार रुपयांचे बक्षीस देतो अशी झणझणीत टीका रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी केली आहे. रामराजे हे बिन लग्नाची औलाद आहेत. त्यांच्या बद्दल मला एवढ्या खालच्या पातळीला जाऊन बोलायचे नव्हते मात्र त्यांच्या वडिलांना मालोजीराजेंनी घरात देखील घेतले नव्हते हि वस्तुस्थिती आहे असे रणजितसिंह नाईक निंबाळकर म्हणाले आहेत.

चोराच्या आळंदीला गेलेल्यांनी जनतेची माफी मागावी ; सदाभाऊ खोतांचा राजू शेट्टीना टोला

दरम्यान रणजितसिंह नाईक निंबाळकरांच्या या टीकेला कोणीत उत्तर दिलेले नाही. माढा मतदारसंघातून राष्ट्रवादीच्या संजय शिंदे यांचा दणदणीत पराभव केलेल्या रणजितसिंह नाईक निंबाळकरांची फलटण येथे विजय सभा आयोजित करण्यात आली होती. त्यावेळी ते बोलत होते. रामराजे नाईक निंबाळकर यांनी लोकसभा निवडणुकीच्या दरम्यान राष्ट्रवादीचा तगडा प्रचार केल्याने रणजितसिंह नाईक निंबाळकर स्वतःच्या तालुक्यातून चांगले लीड घेऊ शकले नाहीत म्हणून याच गोष्टीचा राग मनात धरून रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी रामराजेंवर चांगलेच तोंडसुख घेतले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here