मुंबई प्रतिनिधी | राज्य मंत्री मंडळ विस्तार उद्या होणार हे जवळपास निश्चित मानले जाते आहे. मात्र या मंत्री मंडळ विस्तारात अकलूजचे रणजितसिंह मोहिते पाटील पुन्हा एकदा वंचित राहणार असल्याचे बोलले जाते आहे. रणजितसिंह मोहिते पाटील यांचा मंत्री मंडळ विस्तारात मंत्री मंडळात समावेश केला जाणार अशी चर्चा होती. मात्र त्यांचे नाव आता चर्चेच्या वर्तुळातून बाहेर पडले आहे.
राज्य मंत्री मंडळाचा उद्या विस्तार ; ‘या’ नेत्यांना मिळणार मंत्री पदे
राज्य मंत्री मंडळातचा उद्या विस्तार होणार आहे. यात जयदत्त क्षीरसागर आणि राधा कृष्ण विखे पाटील या मूळच्या काँग्रेसी नेत्यांना मंत्री मंडळात सामावून घेतले जाणार आहे. मात्र रणजितसिंह मोहिते पाटील यांनाच मंत्री पदापासून दूर का ठेवले जात आहे. या बद्दल राजकीय वर्तुळात उलट सुलट चर्चा रांगू लागल्या आहेत.
पुण्याच्या बुधवार पेठेतील देहविक्री करणाऱ्या तरुणीवर फेकले ॲसिड
रणजितसिंह मोहिते पाटील यांच्या भाजप पक्ष प्रवेशाच्या वेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भाजपमध्ये मोहिते पाटील घराण्यावर अन्याय होणार नाही अशी ग्वाही दिली होती. त्याच प्रमाणे मोहिते पाटील घराण्याचा उचित सन्मान भाजप राखेल असे देखील मुख्यमंत्री म्हणाले होते. तसेच भाजपचे वरिष्ठ नेते चंद्रकांत पाटील यांनी देखील मोहिते पाटलांना मंत्री पद दिले जाणार असे म्हणले होते. अशा अवस्थेत मोहिते पाटील यांना भाजप मध्ये देखील वंचितच ठेवले गेल्याने मोहिते पाटील गटामध्ये आणि कार्यकर्त्यांमध्ये अस्वथता वाढली आहे.