शरद पवारांची अवस्था म्हणजे मजबुरीं का नाम महात्मा गांधी; दानवेंची टीका

Danve Pawar
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | आज महाराष्ट्राची जी काही वाटचाल सुरू आहे ती शरद पवार यांना देखील मान्य नाही पण मजबुरीं का नाम महात्मा गांधी अशी शरद पवार यांची अवस्था झाली आहे असा टोला भाजप नेते आणि केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांनी लगावला आहे. दानवे यांच्या घरी आज धुळवड आणि वाढदिवस असा दोन्ही दिवसांचे खास सेलिब्रेशन रंगले होते त्यावेळी ते बोलत होते.

रावसाहेब दानवे म्हणाले, आज राज्यातलं वातावरण गढूळ आहे. उद्धव ठाकरे यांनी दाऊद ला मदत करणाऱ्या मंत्र्यांचा राजीनामा घेतला पाहिजे. तसेच शरद पवार यांनी काँग्रेस सेना आणि राष्ट्रवादीचे कान धरले पाहिजे मात्र शरद पवारांची सध्याची अवस्था मजबुरी का नाम महात्मा गांधी अशी झाली आहे, अशी टीकाही त्यांनी केली.

दरम्यान, भाजपच्या रंगात भेसळ आहे अशी टीका शिवसेना खासदार संजय राऊत यांनी केल्यानंतर राऊतांनी त्यांचाही समाचार घेतला. कोणाचा रंग काय आहे हे निवडणुकीत कळत. आमचा रंग ओरिजिनल आहे उलट शिवसेनेचा रंग तेंव्हाच फिका पडला जेव्हा त्यांनी दाऊदच्या माणसाला साथ दिली. अशी टीका रावसाहेब दानवे यांनी केली.