अगोदर स्वतःच्या मुलाचं नाव औरंगजेब ठेवा, मग…; दानवेंचा जलील यांना सल्ला

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील यांनी काल औरंगाबाद शहराच्या नामांतराच्या मुद्यावरून टीका केली होती. त्यांच्या टीकेचा आज केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांनी समाचार घेतला. जलील यांना औरंगजेबाचा एवढाच पुळका असेल तर त्यांनी आधी स्वतःच्या मुलाचं नाव औरंगजेब ठेवावं आणि नंतर गावाचं नाव औरंगाबाद करावे, असा सल्ला दानवे यांनी दिला आहे.

मंत्री दानवे यांनी आज माध्यमांशी संवाद साधला. यावेळी ते म्हणाले कि, सुरुवातीला औरंगाबादचे संभाजीनगर असे नामांतर करण्याची मागणी आम्ही केली होती. ती पूर्ण झाली. काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसदेखील प्रस्ताव मंजुरीवेळी उपस्थित होते. त्यामुळे ते देखील या निर्णयाविरोधात रस्त्यावर उतरून आंदोलन करू शकत नाहीत.

ईडीच्या कारवाईमागे राजकारण नाही – दानवे 

यावेळी दानवे यांनी देशात भाजपाच्या विरोधी पक्षांवरच ईडीच्या कारवाया होत असल्याचा आरोप केला जातोय. याला उत्तर दिले. ते म्हणाले की, ‘ ईडीच्या कारवाया फक्त शिवसेनेवर झाल्या असे नाही, काँग्रेसच्या काळातही नेत्यांच्या चौकशी सुरू होत्या. आमच्या लोकांवर कारवाई झाली तेव्हा आम्ही कायद्याने लढलो. हे तोंडानं लढतात. तोंडामुळे हे वाया गेले. ईडीची कारवाई कायद्याने होत आहे, यामागे राजकारण नाही, असे दानवे यांनी म्हंटले.