नाशिक प्रतिनिधी | आमच ठरलयचा नारा देत रावसाहेब दानवे यांनी नाशिकात भाजपच्या महिला राज्य कार्यकारणीचे उद्घाटन केले. यावेळी रावसाहेब दानवे यांनी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत महिलांना ३३ टक्के आरक्षण देण्याबाबत देखील भाष्य केले आहे.
आमचं ठरलयं ! सतेज पाटील ‘या’ पक्षाकडून लढवणार विधानसभा
रावसाहेब दानवे यांनी आगामी काळात मुख्यमंत्री कोण होणार याबाबत भाष्य करताना आमचं ठरलय अस वक्तव्य केले. रावसाहेब दानवे म्हणाले कि मुख्यमंत्री पदी कुणी बसायचे या बाबत शिवसेने सोबत आमचे आधीच ठरले आहे. त्यामुळे शिवसेना भाजप मध्ये कसलेच मतभेद नाहीत. आता निवडणुका फक्त पार पडण्याची औपचारिकता उरली आहे विजय आपलाच आहे असे रावसाहेब दानवे म्हणाले आहेत.
तुमच्या आमच्या हृदयात भगवा आहे ; दिल्लीत गेलो तरी लढाई जिंकू : उद्धव ठाकरे
पदाची अपेक्षा ठेवून राजकारणात कधीच काम करू नका. कारण आपल्याला अपेक्षित असणारे पद राजकारणात मिळेलच असे नाही. त्यामुळे तुम्ही काम करत राहा एक दिवस तुम्हाला ते पद मिळेल असे रावसाहेब दानवे म्हणाले आहेत. तसेच महिला आरक्षणाबाबत देखील रावसाहेब दानवे यांनी आपले मत व्यक्त केले आहे. महिलांना राजकारणात ३३ आरक्षण देण्यासाठी भाजप कटिबद्ध आहे. मात्र काही राजकारणाच्या बाबीमुळे हे विधेयक प्रलंबित राहिले आहे. मात्र भाजप हे विधेयक पास करेल असा विश्वास रावसाहेब दानवे यांनी व्यक्त केला आहे.
विधानसभा निवडणूक २०१९ : महाराष्ट्रातील ‘या’ मतदारसंघात होणार चुलत्या पुतण्याची लढाई
खुशखबर ! आता कोणत्याही रेशन दुकानातून रेशन खरेदी करता येणार
चंद्रकांत पाटलांनी केला भूखंड घोटाळा ? जयंत पाटलांनी केली राजीनाम्याची मागणी
कृष्ण भीमा स्थिरीकरण योजना राबवणे अशक्य : गिरीश महाजन
आढळरावांचा पराभव ; ४ वेळा जि.प सदस्य म्हणून निवडून आलेल्या आशा बुचकेंची शिवसेनेतून हकालपट्टी