बाप लेकीच्या नात्याला काळिमा 

0
54
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

टीम, HELLO महाराष्ट्र । बाप लेकीच्या नात्याला जगात तोड नाही असे आपण म्हणतो परंतु काही नराधमांमुळे या पवित्र नात्याला काळिमा फसला जातोय. समाजातील विकृत मानसिकतेच्या वाढत्या पेवामुळे बलात्कार दिवसेंदिवस वाढतच चालले आहेत. अशीच एक धक्कादायक घटना नालासोपारा येथे घडलीय. एका नराधम बापानेच आपल्या ७ वर्षाच्या अल्पवयीन मुलीवर अत्याचार केला असून, या प्रकरणी तुळींज पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

नालासोपारा पूर्वेकडील श्रीराम नगर येथे एका नराधम बापाने त्याच्या ७ वर्षाच्या मुलीवर अत्याचार केल्याची तक्रार पिडीत मुलीच्या आईने तिच्या पती विरोधात केली आहे. फिर्यादी या आपल्या पतीसोबत राहत असून तिला २ मुली आणि एक मुलगा आहे. मोठी मुलगी हि ७ वर्षाची आहे.

पंडित मुलीची आई वसईला कामाला जाते व तीचा पती हा रिक्षा चालक आहे. पत्नी कामाला गेल्यावर नराधम बापाने  त्याच्या छोट्या मुलीला व मुलाला खेळण्यासाठी बाहेर पाठवले आणि ७ वर्षाच्या मुलीला घरात घेवून तिच्यावर अत्याचार केलाय. हि घटना पिडीत मुलीने तिच्या आईला सांगितल्यावर तिने दिलेल्या फिर्यादीवरून तुळींज पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला असून त्या नराधम बापाला तुळींज पोलिसांनी अटक केली आहे. पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक तौफिक सय्यद हे करीत आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here