धक्कादायक ! अभिनेत्रीसह बहिणीवर बलात्कार, 5 जणांविरोधात FIR दाखल

Rape
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

नालासोपारा : हॅलो महाराष्ट्र – मुंबईत सध्या कोरोना मोठ्या प्रमाणात वाढल्यामुळे ठिकठिकाणी लॉकडाऊन लावण्यात आला आहे. पण तरीदेखील गुन्हेगारी काय कमी होताना दिसत नाही. नुकतीच आता मुंबईतील नायगाव परिसरात एक धक्कादायक घटना घडली आहे. एक २५ वर्षीय अभिनेत्रीसह तिच्या बहिणीवर बलात्कार करण्यात आला आहे. या प्रकरणी अभिनेत्रीने वालीव पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दिली असून 5 जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

काय आहे प्रकरण
आरोपी महासुबेर परिद याने नायगाव परिसरात राहणाऱ्या 25 वर्षीय पीडित अभिनेत्रीला दारूमधून गुंगीचे औषध देऊन तिच्यावर अत्याचार केला. त्यानंतर या आरोपीने तिच्या बहिणीवरदेखील अत्याचार केला. तर महासुबेर परिद याचा मित्र आरोपी रमेश याने दोन्ही बहिणीचे हात आणि पाय धरून स्वत: जवळ ओढून त्यांच्याबरोबर अश्लिल चाळे केले. तसेच बाकी 3 आरोपी सुधीर चंद्रशेखर, अभिनव विख्यात आणि जगन्नाथ यांनी दोन्ही बहिणींसोबत गैरकृत्य करत त्यांचे कपडे काढून त्यांचा अश्लिल व्हिडीओ रेकॉर्ड केले. या दोन्ही बहिणींनी त्यांना जोरदार विरोध केला पण त्याचा काही उपयोग झाला नाही.

यानंतर आरोपींनी त्यांना शिवीगाळ आणि दमदाटी करून त्यांना जीवे मारण्याची धमकी दिली. हा सगळा प्रकार 24 ते 29 एप्रिलच्या दरम्यान कर्नाटक या ठिकाणी घडला. यानंतर पिडीत अभिनेत्री आणि तिची बहीण मुंबईत दाखल झाल्यानंतर त्यांनी पोलीस स्टेशनमध्ये जाऊन पाच जणांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलिसांकडून करण्यात येत आहे.