पटना : वृत्तसंस्था – कोरोनाच्या काळात अनेक जणांना आपला जीव गमवावा लागला आहे तर काही ठिकाणी अनेक विचित्र आणि माणुसकीला काळिमा फासणाऱ्या घटना घडत आहेत. काही दिवसांपूर्वीच एका रुग्णालयातील स्टाफवर कोरोनाबाधित महिलेवर बलात्कारचा प्रयत्न केल्याचा आरोप करण्यात आला होता. या प्रकरणातील कोरोनाबाधित महिलेचा आता मृत्यू झाला आहे. त्यामुळे या प्रकरणाला नवीन वळण लागले आहे. आपल्या आईच्या मृत्यूनंतर तिच्या मुलीने हि हत्या असल्याचा आरोप करत शास्त्रीनगर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. तसेच छेडछाड आणि हात-पाय बांधल्याचा आरोपसुद्धा करण्यात आला आहे. रुग्णालयातील स्टाफमधील तीन अज्ञांताविरोधात हि तक्रार दाखल केली गेली आहे. हि घटना बिहारच्या पटनामधील पारस रुग्णालयामध्ये घडली आहे.
मृत महिला हि नालंदा जिल्ह्यातील रहिवासी होती. ती अंगणवाडीमध्ये सेविका होती. 15 वर्षांपूर्वी तिच्या वडिलांचा मृत्यू झाला होता अशी माहिती मुलीकडून देण्यात आली आहे. 16 मे रोजी संध्याकाळी सहा आणि 17 मे सकाळी 11 वाजताच्या दरम्यान पारस रुग्णालयात तिच्या आईवर बलात्कार करण्याचा प्रयत्न करण्यात आला होता. असे काही दिवसांपूर्वी मुलीने म्हंटले होते कि सध्या आईला व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आले असून ती पूर्णपणे ठीक झाल्यानंतरच याबद्दलची संपूर्ण माहिती देईल.
मुलीने रुग्णालयातील स्टाफने आईवर बलात्कारचा प्रयत्न केल्याचा आरोप केला आहे. मात्र रुग्णालय प्रशासनाकडून हे सगळे आरोप फेटाळण्यात आले. मुलीने केलेले आरोप खोटे असल्याचे रुग्णालय प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे. माझी आई माझ्यासोबत पायी चालत रुग्णालयात आली होती, मात्र डॉक्टरांनी माझ्याकडून आईची प्रकृती गंभीर असल्याचे सांगून सही करुन घेतली. पोलिसांकडून या घटनेचा पुढील तपास करण्यात येत आहे.