धक्कादायक ! झाड तोडण्यास नकार दिल्याने मारहाण करत दलिताच्या गरोदर पत्नीवर मुलांसमोरच बलात्कार

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

छत्तरपूर : वृत्तसंस्था – छत्तरपूर या ठिकाणी एक धक्कादायक घटना घडली आहे. या घटनेत दलित मजुराला शेतावर कामाला बोलावल्यानंतर त्याने झाड तोडण्यास नकार दिल्यामुळे त्याला मारहाण करण्यात आली. या मारहाणीनंतर तो पळून गेला. या नंतर गुंडानी थेट त्याच्या घरी पोहोचून त्याची गरोदर पत्नी, दोन मुले आणि आईलादेखील मारहाण केली. यानंतर त्यांचे अपहरण करून त्यांचा 4 दिवस अमानुष छळ करण्यात आला. हे नराधम इतक्यावरच थांबले नाहीत तर, त्यांनी मुलांसमोरच या मजुराच्या गरोदर पत्नीवर बलात्कारसुद्धा केला. हि घटना मध्यप्रदेशातील छतरपूर या ठिकाणी घडली आहे. या प्रकरणी पोलिसांत तक्रार दाखल करण्यात आली आहे. या प्रकरणातील मुख्य आरोपी हा गावातीलच असल्यामुळे त्याला गुरुवारी अटक करण्यात आली आहे. तसेच या प्रकरणातील त्याचे दोन साथीदार फरार आहेत.

या घटनेनंतर मजुराच्या पत्नीने पत्रकारांशी बोलताना तिच्यावर बलात्कार झाल्याची माहिती दिली. मात्र, पोलिसात दाखल करण्यात आलेल्या तक्रारीत तिने याबाबत कोणताच उल्लेख केला नाही. जर तिने याबाबत लेखी माहिती दिली तर तर आरोपींवर बलात्काराच्या गुन्ह्याचंही कलम लावण्यात येईल, असे पोलिसांकडून सांगण्यात आले आहे. सध्या या गुन्ह्यातील आरोपींवर मारहाण करून इजा पोहोचवणे, अपहरण, अश्लीलता, अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमाती अत्याचार निवारण कायद्याअंतर्गत आरोप लावण्यात आले आहेत. महिलेच्या शरीरावर मारहाणीच्या खुणा आहेत. याबाबत तिने आपल्या तक्रारीत सांगितले आहे. मात्र तिने आपल्यावर बलात्कार झाल्याचा कोणताच उल्लेख आपल्या तक्रारीत केला नाही अशी माहिती राजनगर ठाणे प्रभारी पंकज शर्मा यांनी दिली आहे.

हि घटना मध्यप्रदेशातील छतरपूर या ठिकाणी घडली आहे. या घटनेतील दलित मजुराच्या कुटुंबीयांना चार दिवस डांबून ठेवल्याची जेव्हा पत्रकारांना समजली तेव्हा त्यांनी याची माहिती पोलिसांना देऊन त्यांची सुटका केली. या घटनेत 32 वर्षीय दलित मजुराने आरोपींना शेतातील झाड तोडण्यास नकार दिल्याने गुंडानी मजुरासह त्याच्या कुटुंबीयांवर अत्याचार केल्याची संतापजनक घटना घडली आहे. या मजुराने तब्येत ठीक नसल्याचे कारण सांगत त्याने झाड तोडण्यास नकार दिला होता. याप्रकरणी आतपर्यंत तीन आरोपींवर गुन्हा दाखल करण्यात आला होता. यामधील मुख्य आरोपीला पकडण्यात पोलिसांना यश आले आहे. अद्याप दोन जण फरारी आहेत.

Leave a Comment