मुंबई । देशातील उदयोजक क्षेत्रात नावाजलेले नाव म्हंटल कि टाटा यांच्या नावाचा उल्लेख होतो. अनेक संकटाच्या वेळी टाटा सन्स ऑफ लिमिटेड या कंपनीकडून आर्थिक मदतीचा ओघ सुरु होतो. नैसगिर्क असो किंवा आरोग्य विषयी असो या सगळ्या संकटाच्या वेळी टाटा समूह धावून येतात. अगदी कोरोनाच्या संकटाच्या काळी हि त्यांनी राज्य सरकारला आर्थिक मदत केली होती.
टाटा कंपनीच्या समूहात किंहा टाटा उद्योजक संस्थेमध्ये टाटा व्यक्तीला सर्व अधिकार दिले गेले नाहीत. कदाचित मी सध्या टाटा समूहाचा अध्यक्ष आहे परंतु यापुढे टाटा नावाची व्यक्ती अध्यक्ष असेल असं नाही. माणसाचं आयुष्य फार कमी आणि मर्यादित आहे. परंतु संस्थेचे आयुष्य हे अमर्याद असते. त्यात कोणत्याही हितसंबंधांचा समावेश होऊ शकत नाही टाटा कुटुंबीयांचा टाटा सन्स लिमिटेड मध्ये कोणत्याही प्रकारचा हितसंबंध नाही अशी प्रतिक्रिया त्यांनी एका दाखल केलेल्या याचिकेवर दिली.
टाटा समूहामध्ये जेवढे भाग भांडवल असते त्या पद्धतीनेच त्यातील नफा मिळाला जातो. त्याच पद्धतीने माझ्या कुटुंबांचा तीन टक्के भाग भांडवल आहे . त्यामुळे तितकाच नफा मिळतो . सध्या टाटा सन्स च्या अध्यक्षपदावर एन चंद्रशेखर आहेत. याचा टाटा कुटुंबियांशी कोणताही संबंध नाही असेही प्रतिपादन केले.