“… त्यापेक्षा Elon Musk यांनी भारतात गुंतवणूक करावी” – अदार पूनावाला

Elon Musk
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । गेल्या महिन्यात एलन मस्कने (Elon Musk) ट्विटरला 44 अब्ज डॉलर्स (सुमारे 3368 अब्ज रुपये) मध्ये खरेदी करण्याची घोषणा केली होती. ट्विटरच्या बोर्डाने एलन मस्कची ही ऑफर स्वीकारली. हा करार पूर्ण झाल्यानंतर एलन मस्क हे जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती बनतील. एलन मस्कने ट्विटर विकत घेतल्याची जगभरात चर्चा होते आहे. याविषयी उद्योग जगतातून विभिन्न प्रतिक्रिया उमटत आहेत. काही जणांनी या डीलला अनावश्यक असे म्हंटले आहे.

आता Serum Instindia चे CEO आदर पूनावाला यांनी या प्रकरणी नुकतेच एक ट्विट केले आहे. यामध्ये पूनावाला यांनी लिहिले आहे की,”हाय मस्क, तुम्ही अद्याप ट्विटर खरेदी केले नसेल, तर भारतात टेस्ला कारच्या मोठ्या प्रमाणावर उत्पादनासाठी काही भांडवल गुंतवा. मी तुम्हाला खात्री देतो की, तुम्ही केलेली ही सर्वोत्तम गुंतवणूक असेल.”

अनेक लोकांनी या डीलला अनावश्यक म्हंटले आहे. एवढ्या पैशात मस्क (Elon Musk) काहीतरी चांगले विकत घेऊ शकले असते असे सर्व तज्ज्ञांना वाटते. ट्विटरच्या शेअर्सची किंमतही सातत्याने घसरत आहे. कराराच्या वेळी, ट्विटरच्या शेअर्सची किंमत सुमारे $51.70 होती. गेल्या वर्षी ऑक्टोबरपासून या वर्षाच्या सुरुवातीपर्यंत कंपनीच्या शेअर्सची किंमत जवळपास निम्म्यावर आली होती आणि अशा परिस्थितीत बोर्ड सदस्यांना एलन मस्कची ही ऑफर नाकारता आलेली नाही.

एप्रिलच्या सुरुवातीलाच मस्कने (Elon Musk) ट्विटर मधील 9.2 टक्के शेअर्स विकत घेतले. यानंतर कंपनीने त्यांना बोर्डात समाविष्ट करण्याचा निर्णय घेतला. त्यावेळी मस्कने बोर्डात सहभागी होण्यास नकार दिला होता. यानंतर, मस्कने 54.20 प्रति शेअर दराने ट्विटर खरेदी करण्यासाठी त्यांनी $ 44 अब्जची ऑफर दिली.

हे ही वाचा : Twitter चा वापर करण्यासाठी आता द्यावे लागणार पैसे; Elon Musk यांनी केली मोठी घोषणा