हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | भारतीय संघाच्या ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी तिन्ही प्रकारच्या संघाची निवड झाली असून त्यामध्ये आक्रमक सलामीवीर रोहित शर्मा ला दुखापतीमुळे वगळण्यात आले आहे. परंतु मुंबई इंडियन्स मधील त्याचा सहकारी खेळाडू सुर्यकुमार यादवला चांगल्या फॉर्मात असूनही दुर्लक्षित केलं गेलं. त्यामुळे चाहत्यांना आश्चर्याचा धक्का बसला. गेली 4-5 वर्षांपासून सुर्यकुमार यादव मुंबईसाठी खोऱ्याने धावा काढत आहे.
स्थानिक क्रिकेट आणि आयपीएलमध्ये आश्वासक खेळी करत असतानाही सूर्यकुमारला संधी मिळत नसल्यामुळे चाहते नाराज झाले होते. त्यातच संघाची निवड झाल्यानंतर सूर्यकुमारने रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु सामन्यात नाबाद अर्धशतकी खेळी करत निवड समितीला चोख प्रत्युत्तर दिलं. सूर्यकुमारच्या या खेळीने प्रभावित झालेल्या रवी शास्त्रींनीही त्याला संयम ठेवण्याचा सल्ला दिला.
परंतू चांगली कामगिरी केल्यानंतर सूर्यकुमारला भारतीय संघात स्थान का मिळत नाही यावर रवी शास्त्रींनी उत्तर दिलं. “सध्या भारतीय संघात अनेक प्रतिभावान तरुण खेळाडूंचा भरणा आहे. अशा परिस्थितीत ३० वर्षीय खेळाडूला संधी मिळणं कठीण आहे. म्हणूनच मी तरुण खेळाडूंना संयम राखण्याचा सल्ला देतोय. सूर्यकुमार यादवप्रमाणे अजुन ३-४ खेळाडू आहेत की जे चांगली कामगिरी करत आहेत. पण ज्यावेळी तुमच्या सध्याच्या संघात अनुभवी आणि तरुण खेळाडूंचा भरणा असतो अशावेळी इतर खेळाडूंना संधी देणं कठीण होऊन बसतं.” अस रवी शास्त्री म्हणाले.
ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7875002893 या नंबरला whatsapp करा आणि लिहा ‘Hello News’