युती तुटण्याचे संकेत : संजय राऊत म्हणतात

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

मुंबई प्रतिनिधी | “शिवसेनेला १४४ जागा मिळाल्या नाही तर युती तुटू शकते,” या शिवेसना नेते आणि परिवहन मंत्री दिवाकर रावते यांनी केलेल्या वक्तव्याची शिवसेनेचे नेते आणि खासदार संजय राऊत यांनी पाठराखण केली.

राजू शेट्टी लढवणार विधानसभा ; या मतदारसंघातून लढवणार निवडणूक

युतीबाबत बोलण्याचे अधिकार फक्त तीनच व्यक्तींना आहे. त्यांच्याशिवाय कुणालाही नाही, असा टोला भाजपाचे नेते आणि जलसंपदा मंत्री गिरीश राऊत यांनी लगावला होता. ५०-५० फॉर्म्युला अमित शाह यांच्यासमोर ठरला आहे. त्यामुळे रावते काहीही चुकीचे बोललेले नसल्याचे संजय राऊत म्हणाले.

शिवेंद्रराजेंचा पराभव करण्यासाठी राष्ट्रवादीने केला हा मास्टर प्लॅन ; भाजपमधून केला जाणार उमेदवार आयात

राज्यातील विधानसभा निवडणूक तोंडावर आलेली असताना युती होणार की नाही याबद्दल संभ्रमाचे वातावरण आहे. युतीवरून दोन्ही पक्षातील नेते वेगवेगळ्या भूमिका मांडत आहेत. “युतीच्या जागावाटपाचा प्रश्न वरिष्ठ पातळीवरील आहे. त्याबद्दल बोलण्याचा अधिकार फक्त तीन लोकांनाच आहे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह आणि राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे तीन व्यक्तीनांच युतीबद्दल बोलण्याचा अधिकार आहे. युती होणार आहे. पुढच्या चार ते पाच दिवसांत जागावाटपाचा तिढा सुटेल,” असे महाजन म्हणाले होते.

ब्रेकिंग| सुजय विखे ,सदाशिव लोखंडेंची खासदारकी जाणार!