हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । मुंबईसह राज्यभर एसटी कर्मचाऱ्यांच्यावतीने विविध मागण्यानासाठी आक्रमक पावित्रा घेत आंदोलन केले जात आहे. यावरून भाजप नेत्यांकडून महाविकास आघाडी सरकावर टीका केली जात आहे. रयत क्रांती संघटनेचे नेते तथा माजी मंत्री सदाभाऊ खोत यांनी राज्य सरकारवर निशाणा साधला. “आम्ही मढ्याच्या टाळूवरचे लोणी खाणारे नाही, या सरकारला संप मिटवायचाच नाही,” अशी टीका खोत यांनी केली.
सदाभाऊ खोत यांनी आज माध्यमांशी संवाद साधला. यावेळी ते म्हणाले की, ” राज्यात आज विविध मागण्यांनासाठी एसटी महामंडळाचे कर्मचारी आंदोलन करीत आहे. अनेकजण आपल्या मुलाबाळांसह मुंबईत आले आहेत. या कर्मचाऱयांच्या काही मागण्या आहे. मात्र, त्या सरकारकडून मान्य केल्या जात नाहीत. काल आम्ही परिवहनमंत्री अनिल परब यांच्याशी चरचा केली. यावेळी त्यांनी विलीनीकरणाची मागणी मान्य न करणार असल्याचे सांगितले. या सरकारचे चालले आहे काय. या सरकारला कर्मचाऱ्यांचा हा चाललेला संप मिटवायचाच नाही असे दिसते. या सरकारला आम्ही एक सांगू इच्छितो कि आम्ही मध्यावरच्या टाळूवरचे लोणी खाणारे नाही.
एसटी कर्मचाऱ्यांच्या विविध मागण्यांबाबत चर्चा करण्यासाठी कर्मचाऱ्यांच्या शिष्टमंडळाने काल परिवहनमंत्री अनिल परब यांची भेट घेतली. यावेळी सदाभाऊ खोत, भाजप नेते गोपीचंद पडळकर यांचीही उपस्स्थिती होती. यावेळी झालेल्या चर्चेत विलीनीकरणाची प्रमुख मागणी शिष्टमंडळाने परिवहनमंत्री परब यांच्यापुढे ठेवली. मात्र, मंत्री परब यांनी विलीनीकरणाची मागणी मान्य करणार नसल्याचे सांगितले. तसेच इतर मागण्या मान्य करणार असल्याचे सांगत संप मागे घेण्याची व कामावर येण्याचे कर्मचाऱ्यांना आवाहन केले. यावेळी परिवहनमंत्री परब यांच्यासोबत झालेल्या चर्चेबाबत कर्मचाऱ्यांशी चर्चा करून निर्णय कळवू, असे शिष्टमंडळाने सांगितले. मात्र, आज पुन्हा कर्मचाऱ्यांनी आक्रमक पावित्रा घेतला आहे.