रयत शिक्षण संस्थेकडून मुख्यमंत्री सहायता निधीसाठी 2 कोटी 36 लाखांचा निधी

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची वर्षा निवासस्थानी भेट घेतली. मुख्यमंत्री आणि पवारांमध्ये तब्बल तासभर चर्चा झाली. यावेळी शरद पवार यांनी रयत शिक्षण संस्थेच्या वतिने 2 कोटी 36 लाख 84 हजार 757 रूपयांचा धनादेश मुख्यमंत्री सहायता निधीत देण्यात आला आहे.

राज्यात पुन्हा कोरोनाची लाट येण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. हा संभाव्य धोका टाळण्यासाठी राज्य सरकार जोरदार प्रयत्न करत आहे. या पार्श्वभूमीवर रयत शिक्षण संस्थेकडून मुख्यमंत्री सहायता निधी (कोविड-19) साठी 2 कोटी 36 लाख 84 हजार 757 रुपयांचा धनादेश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे संस्थेचे अध्यक्ष खासदार शरद पवार यांनी सुपूर्द केला.

रयत शिक्षण संस्थेच्या राज्यातील विविध शाळा, महाविद्यालयातील शिक्षक आणि शिक्षकेतर सेवकांनी या निधीसाठी एक दिवसाचे वेतनाचे योगदान दिले आहे. या निधीचा धनादेश मुख्यमंत्री सहाय्यता निधी कोविड-१९ साठी देण्यात आला आहे. यावेळी राज्याचे मुख्य सचिव सीताराम कुंटे उपस्थित होते.

 

Leave a Comment