हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । करोना विषाणू संसर्गाविरोधात लढण्यासाठी अनेक उद्योगपती, प्रसिद्द व्यक्ती, राजकारणी, संस्था पुढे सरसावले आहेत. अनेकांनी आपल्या परीने या लढ्यात सहभागी होण्यासाठी पुढाकार घेतला आहे. कोरोनाच्या लढ्यात आता महाराष्ट्रातील प्रतिष्ठित रयत शिक्षण संस्था सामाजिक जबाबदारीचे भान ठेवून पुढे आली आहे. करोनाच्या लढ्यात सरकारला हातभार लावण्यासाठी रयत शिक्षण संस्थेकडून २ कोटींचा निधी मुख्यमंत्री सहायता निधीसाठी दिला जाणार आहे.
याबाबतची घोषणा रयत शिक्षण संस्थेचे अध्यक्ष आणि माजी केंद्रीय कृषीमंत्री शरद पवार यांनी केली आहे. करोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी सामाजिक जबाबदारीच्या भावनेतून रयत शिक्षण संस्थेतील शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी एक दिवसाचे वेतन एकत्रित करून सुमारे २ कोटींचा निधी धनादेशाद्वारे मुख्यमंत्री सहायता निधीसाठी देण्याचा निर्णय एकमुखाने घेतला असल्याचे पवार यांनी स्पष्ट केले आहे.
ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “HelloNews’
हे पण वाचा –
महाराष्ट्रात करोनाबाधितांचा आकडा २१५वर
धक्कादायक! अमेरिकेत १ ते २ लाख लोकांचा मृत्यू होण्याची भीती
जगातील पहिल्या कोरोनाग्रस्ताचा लागला शोध, कोण आहे ‘हा’ व्यक्ती? घ्या जाणून
भारत कोरोना संक्रमणाच्या तिसऱ्या टप्प्यात आहे म्हणजे नेमकं काय?
इटलीमध्ये कोरोनाचे एवढे बळी का?
नेटफ्लिक्सवर ‘या’ वेबसिरिजमध्ये करण्यात आली होती कोरोना व्हायरसची भविष्यवाणी! घ्या जाणुन