हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । RBI कडून आता आणखी एका सहकारी बँकेला मोठा धक्का देण्यात आला आहे. RBI ने यावेळी पुण्यातील सेवा विकास सहकारी बँक लिमिटेडचे लायसन्स रद्द केले आहे. पुरेसे भांडवल तसेच भविष्यात कमाईची कोणतीही शक्यता नसल्याने या बँकेचे लायसन्स रद्द करण्यात येत असल्याचे आरबीआयने सांगितले आहे.
यानंतर आता बँकेच्या ठेवीदारांना डिपॉझिट्स इन्शुरन्स अँड क्रेडिट गॅरंटी कॉर्पोरेशन (DICGC) अंतर्गत डिपॉझिट्सचे पैसे दिले जातील. हे लक्षात घ्या कि, 14 सप्टेंबरपर्यंत DICGC कडून एकूण विमा उतरवलेल्या डिपॉझिट्सपैकी 152.36 कोटी रुपये आधीच भरण्यात आले होते.
10 ऑक्टोबर पासून बँक होणार बंद
सोमवारी एक निवेदन देताना RBI ने म्हटले की, या बँकेकडे पुरेसे भांडवल किंवा उत्पन्नाची शक्यता नाही. तसेच सध्याच्या आर्थिक स्थितीत बँक ठेवीदारांना संपूर्ण रक्कम देण्यासही सक्षम नाही. ज्यामुळे 10 ऑक्टोबरनंतर या बँकेला आपला व्यवसाय सुरु ठेवता येणार नाही.
रिझर्व्ह बँकेने पुढे सांगितले की, यापुढे सेवा विकास सहकारी बँकेला आपला बँकिंग व्यवसाय करण्यापासून बंदी घालण्यात आली आहे. आता या बँकेला इतर गोष्टींबरोबरच कोणतेही डिपॉझिट्स जमा करता येणार नाही किंवा डिपॉझिट्सचे पेमेंटही करता येणार नाही.
बँक बुडल्यास ग्राहकांच्या पैशांचे काय होणार
हे लक्षात घ्या कि, DICGC कडून इन्शुरन्स योजनेअंतर्गत बँकांमध्ये जमा असलेल्या रकमेचा 5 लाख रुपयांपर्यंतचा इन्शुरन्स उतरवला जातो. यामुळे, जर एखादी बँक दिवाळखोर झाली किंवा तिचे लायसन्स रद्द झाले तर ग्राहकांचे पैसे गमावण्याचा धोका राहत नाही. DICGC ही भारतीय रिझर्व्ह बँकेची पूर्ण मालकी असलेली उपकंपनी आहे. DICGC कडून 5 लाख रुपयांपर्यंतच्या बँकेच्या डिपॉझिट्सवर इन्शुरन्स कव्हर दिला जातो.
अधिक माहितीसाठी या वेबसाईटला भेट द्या : https://www.sevavikasbank.com/
हे पण वाचा :
IDFC First Bank कडून ग्राहकांना धक्का !!! आता द्यावा लागणार जास्त EMI
Yes Bank ने NRE डिपॉझिट्सवरील व्याजदरात केला बदल, जाणून घ्या नवीन दर
Bank of Maharashtra कडून कर्ज घेणे महागले, बँकेने MCLR मध्ये 0.20 टक्क्यांनी केली वाढ
FD Rates : ‘या’ बँकांच्या एफडीवर मिळेल 7 टक्क्यांहून जास्त व्याज, व्याज दर तपासा
Train Cancelled : रेल्वेकडून आज 145 गाड्या रद्द !!! रद्द झालेल्या गाड्यांची लिस्ट तपासा