हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । RBI कडून नुकतेच देशातील 5 सहकारी बँकांवर विविध निर्बंध लादण्यात आले आहेत. बिघडत चाललेली आर्थिक परिस्थिती हे यामागील कारण असल्याचे रिझर्व्ह बँकेने म्हंटले आहे. ज्यामुळे आता या बँकांमधून पैसे काढण्यावरही बंदी घालण्यात आली आहे. हे निर्बंध पुढील सहा महिने लागू राहणार असल्याचे RBI ने यावेळी स्पष्ट केले आहे. यासोबतच या बँकांना आरबीआयच्या परवानगीशिवाय कोणालाही नवीन कर्ज देता येणार नाहीत किंवा नवीन कर्ज घेता येणार नाहीत. याशिवाय, कोणतीही मालमत्ता ट्रान्सफर किंवा त्याचे निराकरण देखील करता येणार नाही.
याबाबत अधिक माहिती देताना रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने सांगितले की, सध्या या बंदीचा आढावा घेतला जातो आहे. याचा अर्थ असा कि, आता या बँकांच्या कामकाजाचा आढावा घेऊनच ही बंदी हटवण्याचा किंवा ती वाढवण्याचा निर्णय मध्यवर्ती बँकेकडून घेतला जाईल. मात्र यापैकी कोणत्याही बँकांचे लायसन्स रद्द करण्यात आलेले नाही, हे देखील आरबीआयने यावेळी स्पष्ट केले आहे.
‘या’ बँकांवर आली बंदी
इथे हे जाणून घ्या कि, RBI कडून ज्या पाच बँकांवर निर्बंध लादण्यात आले आहेत त्यामध्ये शंकरराव मोहिते पाटील सहकारी बँक, अकलूज (महाराष्ट्र), आदर्श महिला नागरी सहकारी बँक मर्यादित औरंगाबाद (महाराष्ट्र), एचसीबीएल को-ऑपरेटिव्ह बँक लखनऊ (यूपी), शिमशा को-ऑपरेटिव्ह बँक नियामिथा मद्दूर, (कर्नाटक) आणि उरावकोंडा. को-ऑपरेटिव्ह टाऊन बँक, उरावकोंडा, (आंध्र प्रदेश) या बँकांचा समावेश आहे.
आदर्श महिला नागरी सहकारी बँक मर्यादित औरंगाबाद (महाराष्ट्र), शिमशा सहकारी बँक नियामिथा मद्दूर, (कर्नाटक) आणि HCBL सहकारी बँक लखनऊ (UP) या बँकांच्या ग्राहकांना सध्याच्या लिक्विडीटीच्या संकटामुळे आपल्या खात्यामधून पैसे काढता येणार नाहीत. मात्र, शंकरराव मोहिते पाटील सहकारी बँक, अकलूज (महाराष्ट्र) आणि उरावकोंडा को-ऑपरेटिव्ह टाऊन बँक, उरावकोंडा, (आंध्र प्रदेश) या बँकांच्या ग्राहकांना त्यांच्या बँकेतील डिपॉझिट्समधून फक्त 5,000 रुपयेच काढता येतील. याचा अर्थ असा की, या बँकांच्या ग्राहकांच्या खात्यामध्ये कितीही पैसे जमा असले तरीही त्यांना आपल्या खात्यातून फक्त 5,000 रुपयेच काढता येतील.
यासोबतच रिझर्व्ह बँकेने म्हटले की, या पाचही सहकारी बँकांच्या पात्र ठेवी या डिपॉझिट्स इन्शुरन्स अँड क्रेडिट गॅरंटी कॉर्पोरेशनकडून 5 लाख रुपयांपर्यंतच्या डिपॉझिटवर इन्शुरन्स क्लेम मिळण्यास पात्र असतील.
अधिक माहितीसाठी या वेबसाईटला भेट द्या : https://www.rbi.org.in/scripts/FS_PressRelease.aspx?fn=2755
हे पण वाचा :
Credit Score म्हणजे काय ??? त्याचे महत्त्व जाणून घ्या
Torn Notes : जुन्या किंवा फाटलेल्या नोटांबाबत RBI चे नियम जाणून घ्या
Charger : आपला फोन रात्रभर चार्जिंगवर ठेवणे कितपत योग्य आहे??? यामुळे बॅटरीचे काय होईल ते जाणून घ्या
Stock Market Timing : आता शेअर बाजार संध्याकाळी 5 वाजेपर्यंत सुरू राहणार ??? SEBI कडून तयार केला आराखडा
Multibagger Stock : ‘या’ सरकारी कंपनीच्या शेअर्सने दीर्घकालावधीमध्ये गुंतवणूकदारांना मिळवून दिले कोट्यवधी रुपये