नवी दिल्ली । रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने (RBI) बुधवारी बंधन बँक, बँक ऑफ बडोदा आणि स्टेट बँक ऑफ इंडिया (SBI) सह 14 बँकांना विविध नियमांचे उल्लंघन केल्याबद्दल दंड ठोठावला. RBI ने एका निवेदनात ही माहिती दिली. या 14 बँकांमध्ये सार्वजनिक क्षेत्रातील बँका, खाजगी बँका, विदेशी बँका, सहकारी बँका आणि एक स्मॉल फायनान्स बँक समाविष्ट आहे.
या बँकांवर 50 लाख रुपयांपासून 2 कोटी रुपयांपर्यंतचा दंड आकारण्यात आला आहे. RBI ने जारी केलेल्या निवेदनात म्हटले आहे की, “बँकांनी ज्या नियमांचे उल्लंघन केले आहे त्यामध्ये NBFC ला कर्ज देण्याबाबत आणि NBFC ला बँक वित्तपुरवठा करण्याबाबतच्या नियमांकडे दुर्लक्ष केल्याचा आरोप आहे.”
पहिल्यांदाच इतक्या बँकांकडून एकाच वेळी दंड आकारण्यात आला
एकाच वेळी इतक्या बँकांवर RBI ने दंड आकारण्याची ही पहिलीच वेळ आहे. RBI ने म्हटले आहे की, “बँकांमध्ये सेंट्रल रिपॉझिटरी ऑफ लार्ज कॉमन एक्सपोजर, सेंट्रल रिपॉझिटरी ऑन इन्फॉरमेशन ऑन लार्ज क्रेडिट्स (CRILC) चा अहवाल,स्मॉल फायनान्स बँकेच्या ऑपरेटिंग दिशानिर्देशांकडे या बँकांनी दुर्लक्ष केले आहे. यासह बँकांनी बँकिंग नियमन कायदा 1949 च्या कलम 19(2) आणि कलम 20(1) चे उल्लंघन केले आहे.
ज्या इतर बँकांकडून RBI ने दंड आकारला आहे त्यामध्ये बँक ऑफ महाराष्ट्र, सेंट्रल बँक ऑफ इंडिया, क्रेडिट सुईस, इंडियन बँक, इंडसइंड बँक, कर्नाटक बँक, करुर वैश्य बँक, पंजाब आणि सिंद बँक, साउथ इंडियन बँक, जम्मू-के बँक आणि उत्कर्ष स्मॉल फायनान्स बँक यांचा समावेश आहे.
राज्यातील सर्व महत्वाच्या ब्रेकिंग बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आमचा WhatsApp ग्रुप Join करा