हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया (RBI) कडून वेळोवेळी बँकेशी संबंधित नियमांमध्ये बदल केले जात असतात. आताही आरबीआयने बँकेच्या खात्याशी संबंधित नियमांमध्ये अनेक बदल केले आहेत. अशा परिस्थितीत जर आपलेही एखाद्या बँकेमध्ये खाते असेल तर ही बातमी आपल्यासाठी खूपच ठरेल.
RBI च्या नवीन मार्गदर्शक तत्त्वांनुसार, याआधीच आपली वैध कागदपत्रे सादर केलेल्या आणि पत्त्यात कोणताही बदल न झालेल्या खातेधारकांना आता KYC तपशील अपडेट करण्यासाठी बँकेच्या शाखेत जाण्याची गरज नाही.
RBI म्हटले कि…
आरबीआयचे म्हणणे आहे की, KYC तपशीलामध्ये कोणताही बदल न झाल्यास खातेधारकांना त्यांच्या ईमेल आयडी, रजिस्टर्ड मोबाइल नंबर, एटीएम किंवा अन्य डिजिटल माध्यमातून सेल्फ डिक्लेरेशन लेटर सादर करता येतील.
RBI ने जारी केली मार्गदर्शक तत्त्वे
रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाकडून 6 जानेवारी रोजी ही मार्गदर्शक तत्त्वे जारी करण्यात आली केली आहेत. ज्यामध्ये म्हंटले गेले आहे की, ग्राहकांच्या KYC तपशीलामध्ये कोणताही बदल झालेला नसल्यास केवायसी प्रक्रिया पुन्हा पूर्ण करण्यासाठी ग्राहकाचे सेल्फ डिक्लेरेशन लेटर पुरेसे आहे.
बँकांना केले आवाहन
RBI ने आपल्या मार्गदर्शक तत्त्वांमध्ये बँकांना त्यांच्या ग्राहकांना रजिस्टर्ड ईमेल आयडी, क्रमांक, एटीएम इत्यादीद्वारे सेल्फ डिक्लेरेशन करण्याची परवानगी देण्यास सांगितले आहे, जेणेकरून त्यांना बँकेच्या शाखेत जाण्याची गरज भासणार नाही.
अधिक माहितीसाठी ‘या’ वेबसाईटला भेट द्या : https://www.rbi.org.in/CommonPerson/english/scripts/notification.aspx?id=2607#:~:text=%E2%80%9COfficially%20Valid%20Document%E2%80%9D%20(OVD,by%20the%20National%20Population%20Register
हे पण वाचा :
FD Rates : ग्राहकांना बँकांकडून मिळाली नवीन वर्षाची भेट, FD वर देत आहेत जबरदस्त ऑफर
Doorstep Banking म्हणजे काय ??? त्याचा फायदा कोणाकोणाला मिळेल ते जाणून घ्या
अर्थसंकल्पापूर्वी करदात्यांना सरकारकडून भेट !!! आता ‘या’ लोकांना ITR मधून मिळणार सूट
Car च्या डिक्कीत ठेवा ‘हे’ Device; पंक्चर टायर एका मिनिटांत होईल ठीक
‘या’ Penny Stock ने गेल्या 20 महिन्यांत गुंतवणूकदारांच्या भांडवलात केली 150 पटींनी वाढ