RBL Bank च्या ‘या’ क्रेडिट कार्डवरील प्रत्येक ट्रान्सझॅक्शनवर मिळवा 1% कॅशबॅक

RBL Bank
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । RBL Bank : RBI च्या मार्गदर्शक सूचनांनंतर 1 डिसेंबरपासून LazyPay कार्डची सेवा बंद केली गेली आहे. खरं तर, आरबीआयच्या मार्गदर्शक तत्त्वांमध्ये, ग्राहकांसाठी प्रीपेड पेमेंट इंस्ट्रूमेंट्सवर कर्जाची सुविधा देण्यास मनाई करण्यात आली आहे. या दरम्यान आता खाजगी क्षेत्रातील RBL Bank आणि Buy Now Pay Later (BNPL) ची सुविधा देणारी कंपनी असलेल्या LazyPay ने मिळून RBL Bank LazyPay Credit Card लाँच केले आहे. सध्या, RBL Bank कडून या कार्डसाठी अर्ज करण्याची प्रक्रिया सुरू झालेली नाही, मात्र Lazypay ने आपल्या ग्राहकांकडून अर्ली एक्सेससाठी अर्ज मागवले आहेत.

RBL Bank LazyPay Credit Card: हर ट्रांजैक्शन पर पाएं 1% कैशबैक, लाइफटाइम फ्री है कार्ड - get 1 percent unlimited cashback via rbl bank lazypay credit card know features benefits and charges – News18 हिंदी

लाइफटाइम फ्री क्रेडिट कार्ड

इथे हे लक्षात घ्या कि, हे एक लाइफटाइम फ्री क्रेडिट कार्ड आहे. तसेच यासाठी कोणतीही जॉइनिंग अथवा एन्युअल फी द्यावी लागणार नाही. या कार्डचे सर्वात मोठे वैशिष्ट्य असे कि, यामध्ये कॅशबॅकवर कोणतेही कॅपिंग नाही. याचा अर्थ प्रत्येक बिलिंग सायकलमध्ये 1% च्या दराने अनलिमिटेड कॅशबॅक मिळेल.

Not Eligible for a Credit Card: LazyCard Is Here - LazyPay

या कार्डची वैशिष्ट्ये जाणून घ्या

>> हे कार्ड जारी केल्यापासून 30 दिवसांच्या आत खर्च केल्यास कार्डधारकाला वेलकम बेनिफिट म्हणून 250 रुपयांचा कॅशबॅक मिळेल.
>> या क्रेडिट कार्डद्वारे केलेल्या सर्व ऑनलाइन आणि POS ट्रान्सझॅक्शनवर 1% अनलिमिटेड कॅशबॅक मिळेल.
>> फ्यूल पेमेंट्स, इन्शुरन्स पेमेंट्स, रेंटल पेमेंट्स, कॅश आणि क्वासी कॅश ट्रान्सझॅक्शनवर कोणताही कॅशबॅक मिळणार नाही. RBL Bank

LazyPay Review 2022 • BankKaro Blog

LazyPay विषयी जाणून घ्या

सध्याच्या काळात देशातील अनेक कंपन्यांकडून Buy Now Pay Later ची सुविधा दिली जाते आहे. दिवसेंदिवस ही संकल्पना खूपच लोकप्रिय होते आहे. या सुविधेअंतर्गत, कोणत्याही वस्तूची आधी खरेदी करून काही दिवसांनंतर पैसे देता येतात. या सेगमेंटमध्ये Paytm, Mobikwik, Freecharge, Amazon, Slice, UNI, Postpe, LazyPay, Dhani, ZestMoney, Simpl, Kissht, Slice सारख्या फिनटेक कंपन्या सामील आहेत. आता PayU Finance कडूनही Lazypay नावाने Buy Now Pay Later ची सुविधा दिली जाते आहे.

अधिक माहितीसाठी या वेबसाईटला भेट द्या : https://www.rblbank.com/product/credit-cards/rbl-bank-lazypay-credit-card

हे पण वाचा :
Insurance Schemes : ‘या’ सरकारी विमा योजनांच्या प्रीमियममध्ये वाढ, आता भरावे लागणार जास्त पैसे
Axis Bank देखील FD वर देणार जास्त व्याज, जाणून घ्या नवीन व्याजदर
Train Cancelled : रेल्वेकडून आज 350 गाड्या रद्द !!! अशा प्रकारे तपासा रद्द झालेल्या गाड्यांची लिस्ट
Gold Price Today : सोन्या-चांदीच्या दरात घसरण, आजचे दर पहा
Vi च्या प्लॅनमध्ये वर्षभराच्या व्हॅलिडिटीसहीत मिळतील ‘हे’ अतिरिक्त फायदे