हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | आयपीएल मध्ये आज विराट कोहलीच्या रॉयल चॅलेंजर बंगळुरू आणि कोलकाता नाईट रायडर्स मध्ये एलिमिनेटर सामना होणार आहे. कर्णधार म्हणून आयपीएल जिंकण्याची शेवटची संधी विराट कोहली कडे असल्याने आजचा सामना आरसीबीच्या खेळाडूंसाठी तसेच चाहत्यांसाठी अतिशय महत्त्वाचा असणार आहे.
विराट कोहली यंदाच्या हंगामानंतर बेंगळूरुच्या कर्णधारपदावरून पायउतार होणार आहे. त्याच्या नेतृत्वाखाली बेंगळूरुने १४ पैकी नऊ सामने जिंकून तिसऱ्या स्थानासह बाद फेरी गाठली आहे. कोहलीव्यतिरिक्त ग्लेन मॅक्सवेल, एबी डीव्हिलियर्स, देवदत्त पडिक्कल असे एकापेक्षा एक गोलंदाजांवर तुटून पडणारे स्फोटक फलंदाज बेंगळूरुच्या ताफ्यात आहेत. तसेच गोलंदाजी मधेही हर्षल पटेल, मोहम्मद सिराज, युजवेंद्र चहल असे फॉर्मात असलेले गोलंदाज आहेत.
तर दुसरीकडे कोलकात्याचा संघ देखील काही कमी नाही. युवा आणि अनुभवी खेळाडूंची योग्य सांगड बसलेला या संघाने आपल्या दमदार कामगिरीच्या जोरावर प्ले ऑफ मध्ये एन्ट्री केली आहे. युवा भारतीय खेळाडू शुभमन गिल, नितीश राणा, वेंकटेश अय्यर अशी भरवशाची बॅटिंग लाईनअप , सुनील नारायण आणि आंद्रे रसेल सारखे जागतिक दर्जाचे अष्टपैलू आणि लॉकी फर्ग्युसन, वरून चक्रवर्थी, टीम साऊथी सारखे गोलंदाज यामुळे कोलकात्याच्या पराभव करणं विराट कोहलीला वाटत तेवढं सोप्प नक्कीच नसेल.