हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । 5G Smartphone : सध्याच्या काळात अनेक आकर्षक स्मार्टफोन लाँच केले जात आहेत. आता देशात 5G सर्व्हिस झाली आहे. ज्यामुळे 5G ला सपोर्ट करणारे अनेक स्मार्टफोनही बाजारात दाखल होत आहेत. आताही Realme या स्मार्टफोन बनवणाऱ्या कंपनीकडून भारतात Realme 10 Pro+ 5G आणि Realme 10 Pro 5G हे दोन स्मार्टफोन लाँच केले आहेत. Realme च्या या नवीन स्मार्टफोन मध्ये 5G ला सपोर्ट मिळणार आहे. यासाठी कंपनीने जिओसोबत भागीदारी देखील केली आहे. चला तर मग या स्मार्टफोनविषयी जाणून घेउयात…
Realme 10 Pro+ 5G चे फीचर्स जाणून घ्या
या स्मार्टफोनमध्ये Android 13 बेस्ड realme UI 4.0, 120Hz रिफ्रेश रेटचा 6.7-इंच कर्व्ड AMOLED डिस्प्ले, 8GB LPDDR4X रॅम आणि Mali G68 GPU सहीत octa-core 6nm MediaTek Dimensity 1080 5G प्रोसेसर, 108MP प्रायमरी कॅमेरा सेटअपसहीत ट्रिपल रिअर कॅमेरा सेटअप, 16MP सेल्फी कॅमेरा, इन-डिस्प्ले फिंगरप्रिंट सेन्सर, 5,000mAh बॅटरी आणि 67W SuperVOOC चार्जिंग सपोर्टसहीत देण्यात आली आहे. 5G Smartphone
Realme 10 Pro 5G चे फीचर्स जाणून घ्या
स्मार्टफोनमध्ये 120Hz रिफ्रेश रेटसहीत 6.72-इंच फुल-HD+ (1,080x 2,400 पिक्सल) LCD डिस्प्ले, Adreno A619 GPU आणि 8GB LPDDR4X रॅम सहीत Snapdragon 695 5G प्रोसेसर, 108MP प्रायमरी कॅमेऱ्यासहीत डुअल रिअर कॅमरा सेटअप, 16MP सेल्फी कैमरा, 5,000mAh की बॅटरी आणि 33W SuperVOOC फास्ट चार्जिंग सपोर्टसहीत देण्यात आली आहे. 5G Smartphone
इथे हे लक्षात घ्या कि, Realme 10 Pro+ 5G च्या 6GB + 128GB व्हेरिएंटसाठीची किंमत 24,999 रुपये तर 8GB + 128GB व्हेरिएंटसाठीची किंमत 25,999 रुपये आणि 8GB + 256GB व्हेरिएंटसाठीची किंमत 27,999 रुपये ठेवण्यात आली आहे.
त्याच वेळी, Realme 10 Pro 5G च्या 6GB + 128GB व्हेरिएंटसाठीची किंमत 18,999 रुपये आणि 8GB + 128GB व्हेरिएंटसाठीची किंमत 19,999 रुपये ठेवण्यात आली आहे. हे दोन्ही नवीन स्मार्टफोन डार्क मॅटर, हायपरस्पेस आणि नेबुला ब्लू कलर या पर्यायांमध्ये लाँच करण्यात आले आहेत. ग्राहकांना हे स्मार्टफोन फ्लिपकार्ट, रियलमीची वेबसाइट आणि कोणत्याही रिटेल स्टोअरमधून खरेदी करता येतील. Realme 10 Pro + 5G ची विक्री 14 डिसेंबरपासून तर Realme 10 Pro 5G ची विक्री 16 डिसेंबरपासून सुरु होणार आहे. 5G Smartphone
जिओसोबत भागीदारी
याबाबत माहिती देताना Realme ने सांगितले की,” कंपनी आता Reliance Jio च्या सहकार्याने अनेक नवीन बंडल ऑफर आणेल.” याप्रसंगी बोलतांना, Realme India चे CEO माधव सेठ म्हणाले कि,” Realme ने Jio सोबत 5G स्टँडअलोन, NRCA, VoNR सारख्या तंत्रज्ञानासाठी हातमिळवणी केली आहे.”
हे लक्षात घ्या कि, रिलायन्स जिओ हे देशातील एकमेव ऑपरेटर आहे ज्यांनी स्टँड अलोन 5G नेटवर्क लॉन्च केला आहे. स्टँड अलोन 5G नेटवर्कचे वैशिष्ट्य म्हणजे ते 4G नेटवर्कवर अजिबात अवलंबून नाही. तसेच एक अतिशय जलद डेटा हायवे तयार करतो. 5G Smartphone
अधिक माहितीसाठी या वेबसाईटला भेट द्या : https://buy.realme.com/in/goods/601
हे पण वाचा :
आता WhatsApp वरही मिळणार फेसबुक-इन्स्टाग्रामचे ‘हे’ फीचर, मार्क झुकरबर्गने दिली माहिती
Ola ने लाँच केली डिसेंबर टू रिमेंबर ऑफर, झिरो डाउन पेमेंटसोबत 1 वर्षासाठी मिळणार फ्री चार्जिंग
Car Discount Offer : चारचाकी घेण्याचं स्वप्न असेल तर 31 डिसेंबरपर्यंत घ्या निर्णय; ‘या’ गाड्यांवर 1.50 लाख…
FD Rates : ‘या’ दोन बँका ज्येष्ठ नागरिकांना FD वर देत आहेत 9% पेक्षा जास्त व्याज
Gold Price Today : सोन्या-चांदीचे दर घसरले, जाणून घ्या आजचे नवे दर