कमी वयातच केस पांढरे होतायंत? ‘ही’ असू शकतात कारणे

white hair
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । आजकाल अनेक जणांना लहान वयातच केस पांढरे होण्याच्या समस्येला सामोरे जावं लागत आहे. कमी वयातच केस पांढरे झाल्याने समाजात फिरताना अशा व्यक्तींना मोकळेपणाने फिरायला सुद्धा कसतरी वाटत. पांढऱ्या केसांमुळे तुमच्या दिसण्यावर खूप फरक पडतो आणि लहान वयातच म्हातारे झाल्यासारखं फील होत. खरं तर केस पांढरे होण्याची अनेक कारणे आहेत. चला आज आपण त्याबाबत सविस्तर जाणून घेऊया…

तणावामुळे-

आजकाल धावपळीच्या जगात अनेकजण तणावात असतात, मग तो ऑफिसमधील कामाचा असो किंवा घरगुती कारणांमुळे असो… परंतु तणावाचा तुमच्या केसांवरही वाईट परिणाम होतो. त्यामुळे जर तुम्ही कोणत्याही छोट्या छोट्या गोष्टींचा ताण घेत असाल तर हे करू नका कारण यामुळे तुमचे केस वयाच्या आधीच पांढरे होऊ लागतात.

कमी झोपे मुळे-

निरोगी आयुष्यासाठी पुरेशी झोप आवश्यक आहे. माणसाने कमीत कमी ७ ते ८ तास तरी झोप घ्यावी. झोपेच्या माध्यमातून आपल्याला दिवसभरातील एकूण कामातून खरी विश्रांती मिळते. मात्र जर तुम्ही कमी प्रमाणात झोप घेत असाल तर मात्र त्याचा निगेटिव्ह परिणाम तुमच्यावर होऊ शकतो तसेच केस पांढरे होण्यास कमी झोप हे कारणही कारणीभूत आहे. त्यामुळे योग्य प्रमाणात झोप घेतलीच पाहिजे.

धूम्रपानामुळे-

अलीकडे लहान मुले सुद्धा धूम्रपानाच्या आहारी गेली आहेत . परंतु तुम्हाला माहित आहे का ? कमी वयात केस पांढरे होण्यास धूम्रपान हे सुद्धा एक कारण आहे. धूम्रपानामुळे फुफ्फुसाचा कर्करोग आणि हृदयविकाराचा धोका वाढतो. दुसरीकडे, धूम्रपान केल्याने रक्तवाहिन्या संकुचित होऊ शकतात. यामुळे केसांच्या कूपांमध्ये रक्ताचा प्रवाह कमी होतो आणि त्यामुळे केस पांढरे होण्यास सुरुवात होती .