कावीळ या आजाराच्या कारणांबद्दल जाणून घेऊया

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्रा ऑनलाईन। आहारातील चरबीचे योग्यरीत्या विघटन न झाल्यास त्याचे रूपांतर यकृतातील वाढलेल्या चरबीत होते. आहारात साखर, स्निग्ध पदार्थ जास्त असणे आणि बैठ्या जीवनशैलीमुळे हालचालींचा, व्यायामाचा अभाव असणे ही यामागची कारणे आहेत. स्थूलपणा, मधुमेह, थायरॉइड, इतर हार्मोन्सची कमतरता, कोलेस्टेरॉल किंवा ट्रायग्लिसेराइड्सचे रक्तातील वाढते प्रमाण यामुळेसुद्धा यकृतातील चरबी वाढते.

प्रत्येक लठ्ठ व्यक्तीला फॅटी लिव्हरची समस्या असू शकते. मधुमेहाच्या ७० ते ८० टक्के रुग्णांना फॅटी लिव्हर होण्याचा धोका असतो. बॉडी मास इंडेक्सद्वारे हा धोका लक्षात येऊ शकतो. त्यामुळे कावीळ चा आजार पण वाढू शकतो.

यापूर्वी फॅटी लिव्हरची समस्या वयाच्या पन्नाशी-साठीत दिसत असे. बदलती आहारशैली, तेलकट पदार्थांचे अतिसेवन, पिझ्झा-बर्गरसारख्या फास्टफूडमुळे आज तरुणांमध्ये हा आजार बळावताना दिसत आहे.

बहुतांश स्थूल व्यक्तीमध्ये चरबीचे प्रमाण अधिक असू शकते. त्यामुळे सिऱ्हॉसिस वा कॅन्सरचीही भीती असते. साधारणतः सूज आलेल्या २० टक्के रुग्णांना सिऱ्हॉसिस होतो, त्यातील १०-११ टक्के रुग्णांमध्ये ते मृत्यूचे कारण ठरते.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला whatsapp करा आणि लिहा ‘Hello News’