राजस्थान सत्ता संघर्ष: सचिन पायलटांनी घेतली राहुल, प्रियांका गांधींची भेट

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

नवी दिल्ली । राजस्थानात उद्भवलेल्या सत्ता संघर्षानंतर काँग्रेसचे बंडखोर नेते सचिन पायलट यांनी आज काँग्रेसचे नेते राहुल गांधी आणि पक्षाच्या महासचिव प्रियंका गांधी यांची भेट घेतली. काँग्रेस पक्षातील वरिष्ठ नेत्यांच्या हवाल्यानंतर पीटीआयनं वृत्त दिलं असून, सचिन पायलट यांनी राहुल गांधी यांची त्यांच्या निवासस्थानी भेट घेतली. या भेटीतून सकारात्मक परिणाम दिसून येणं अपेक्षित असल्याचं काँग्रेसच्या सूत्रांनी म्हटलं आहे. राहुल गांधी यांच्या भेटीबरोबरच सचिन पायलट हे सध्या काँग्रेसमधील वरिष्ठ नेत्यांचीही संपर्कात आहेत. त्यांच्या काँग्रेसमध्ये परतण्याच्या फॉर्म्युल्यावरही चर्चा सुरू असल्याची माहिती सूत्रांनी दिली.

महिनाभरापूर्वी राजस्थानात सत्तेत असलेल्या काँग्रेसमध्ये मुख्यमंत्री अशोक गेहलोत विरुद्ध सचिन पायलट असा संघर्ष उफाळून आला होता. राजस्थान पोलिसांनी पाठवलेल्या सरकार विरुद्ध षडयंत्र रचण्याच्या आरोपाच्या नोटीसनंतर सचिन पायलट यांनी बंडखोरी केली होती. त्यामुळे सरकारसमोर अस्थिरतेचं संकटही उभं राहिलं होतं. यानंतर मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांनी सचिन पायलट भाजपबरोबर आमदारांच्या घोडेबाजार करत असल्याचा गंभीर आरोप केला.

याशिवाय राजस्थान विधानसभा अध्यक्षांनी सचिन पायलट आणि त्यांच्या समर्थक आमदारांना सदस्यता रद्द करण्याची नोटीस पाठवली होती. हे प्रकरण प्रथम हायकोर्ट आणि नंतर सुप्रीम कोर्टापर्यंत पोहोचले होते. दरम्यान, राजस्थान विधानसभा अध्यक्षांनी सचिन पायलट यांच्याविरुद्धची मागे घेतली. दरम्यान, महिनाभरापासून हा सत्ता संघर्ष सुरू असताना अचानक बंडखोर नेते सचिन पायलट यांनी राहुल गांधी व प्रियंका गांधी यांची भेट घेतली आहे. त्यामुळे गेहलोत-पायलट वादावर पडदा पडण्याबरोबरच राजस्थानातील सत्ता संघर्ष लवकरच मिटण्याची शक्यता आहे.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News.”