सराईत गुन्हेगाराने घरात घुसून महिलेवर केले तलवारीने वार

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now
सांगली प्रतिनिधी |कुपवाड शहरातील रेकाॅर्डवरील गुन्हेगाराने अनैतिक संबंध असणाऱ्या महिलेच्या आईजवळ असलेल्या मुलाला बळजबरीने ओढून घेऊन जाताना विरोध करणा-या परवीन आसंगी या महिलेवर तलवारीने वार केले आहेत.
सराईत गुन्हेगार अमर जाधव याने आपल्या प्रेमीकेच्या आईवर डोक्यात तलवारीचे वार केल्याने ती महिला जखमी झाली आहे. हल्ल्यानंतर आरोपी  फरार झाला आहे. गुन्हेगार अमर जाधव याच्याविरोधात कुपवाड पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे.
शनिवारी रात्री १० वाजण्याच्या सुमारास रेकाॅर्डवरील गुन्हेगार अमर जाधव याने आपल्या प्रियसीच्या  घरी जाऊन तिचा मुलगा अकीब याला बळजबरीने ओढून घेऊन जाण्याचा प्रयत्न केला.  त्यास विरोध करणा-या परवीन आसंगी यांच्यावर तलवारीने प्राणघातक हल्ला करण्याचा प्रयत्न केला. तलवारीचा वार डोक्यात बसल्याने त्या जखमी झाल्या.
यावेळी परवीनच्या दोन्ही मुली मुमताज व अलिशा आईला सोडविण्यासाठी मधे आल्यावर जाधवने मुमताजच्या उजव्या हातावर तलवारीने वार केला. त्यानंतर त्याने या माय लेकींना लाथाबुक्यांनी बेदम मारहाण करून शिवीगाळ केली.
जाधवने परवीन यांच्या घराचा दरवाजा व खिडकीची तोडफोड केली. या घटनेची माहिती एका नागरिकाने कुपवाड पोलिसांना फोनवरून दिली. पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी जाधवला पकडण्याचा प्रयत्न करताना त्याने पोलिसांना ‘तुम्हाला बघून घेतो,’ तुमची लवकरच बदली करतो. अशी धमकी देऊन मोटारसायकलीवरून पळ काढल. संशयित जाधव यांच्यावर कुपवाड पोलिस ठाण्यात खूनाचा प्रयत्न व मारामारी असे गंभीर गुन्हे दाखल आहेत. तो गेल्या पंधरा दिवसापूर्वी एका गुन्ह्यातून जामिनावर कारागृहातून बाहेर आला होता.

Leave a Comment