हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । कोरोना विषाणूशी संबंधित धक्कादायक माहिती समोर आली आहे. जर्मनीतील म्यूनिख रुग्णालयात झालेल्या एका संशोधनात असे समोर आले आहे की, बरे झाले आहेत त्यांच्या शरीरातील अँटीबॉडीज कमी होतात. चीनमध्ये झालेल्या एका तपासात देखील ही गोष्ट समोर आली आहे. या संशोधनात दुसऱ्यांदा संक्रमण होण्याचा संभव असल्याचे देखील समोर आले आहे. सामान्यतः विषाणू संक्रमणातून बरे होणाऱ्या रुग्णांमध्ये रोगप्रतिकारशक्ती प्रतिक्रिया देते आणि आजाराच्या विरोधात संरक्षण करते. याचा अर्थ त्या विषाणूशी लढण्याची रोगप्रतिकारशक्ती तयार होतात. ज्या दुसऱ्यांदा विषाणू संक्रमण झाल्यास आजाराशी लढतात. मात्र या तपासात कोविड च्या अँटीबॉडीज कमी झालेल्या निदर्शनास आले आहे.
चीफ फिजीशियन क्लीमेंस वेंडनर कोविड १९ च्या रुग्णांच्या रोगप्रतिकारशक्ती ची तपासणी करत आहेत. यामध्ये त्यांना अँटीबॉडीज कमी होताना दिसून आल्या आहेत. क्लीमेंस यांनी सांगितले दोन ते तीन महिन्यांच्या दरम्यान तपासणी केलेल्या ९ पैकी ४ रुग्णांमध्ये व्हायरल अटॅक थांबविणाऱ्या न्यूट्रलाइजिंग एंटीबॉडीज चा स्तर कमी झाला आहे. आपले शरीर विषाणू शी लढण्यासाठी अँटीबॉडीज बनवून रोगप्रतिकारशक्ती तयार करते. अँटीबॉडीज म्हणजे प्रोटीन असतात. दुसऱ्यांदा विषाणूने शरीरावर हल्ला केल्यास न्यूट्रलाइजिंग एंटीबॉडीज विषाणूला पकडतात आणि पेशींमध्ये जाण्यास रोखतात. यामुळे संक्रमण थांबते.
बऱ्याच प्रकारच्या संक्रमणासोबत अँटीबॉडीचा आकार संबंधित असतो. आणि SARS-CoV-2 यापेक्षा वेगळे नाही आहे. साइंटिफिक जनरल नेचर मेडिसिन मध्ये प्रकाशित एक चीनी अभ्यास सांगतो आहे की, लक्षणे नसणऱ्या रुग्णांमध्ये रोगप्रतिकारशक्ती चा प्रतिसाद खूप कमकुवत असतो. गंभीर स्वरूपातील रुग्णांच्या तुलनेत लक्षणे नसणारे रुग्ण अधिक अँटीबॉडीज गमावतात. अद्याप संशोधकांना या अँटीबॉडी का कमी होतात हे माहिती झाले नाही आहे. तुलनेत दुसऱ्या कोरोना विषाणूच्या रुग्णांमध्ये अँटीबॉडीज रक्तात १ वर्षापर्यंत राहतात.
ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News”.