हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | नोकरीच्या शोधात असणाऱ्या तरुणांसाठी एक अत्यंत महत्त्वाची बातमी समोर आली आहे. पुणे महापालिकेकडून विविध पदांच्या 288 रिक्त जागांसाठी भरती प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. आत्ता यासंदर्भातील जाहिरात पालिकेकडून प्रसिद्ध करण्यात आली आहे. पुणे महानगर पालिकेत वैद्यकीय अधिकारी, स्टाफ नर्स आणि बहुउद्देशीय आरोग्य सेवक अशा 288 पदांसाठी तरुणांची भरती करण्यात येणार आहे.
पुणे महापालिकेने या जागांवर भरती करण्यासाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यास सुरुवात केली आहे. इच्छुक उमेदवार 31 ऑक्टोंबर ऑक्टोंबरपर्यंत या पदांसाठी अर्ज दाखल करू शकतात. या पदासाठी आवश्यक असणारी शैक्षणिक पात्रता काय असावी? अर्ज शुल्क किती आकारले जाईल? याची सविस्तर माहिती पुढे देण्यात आली आहे.
रिक्त पदे – वैद्यकीय अधिकारी, स्टाफ नर्स, बहुउद्देशीय आरोग्य सेवक (पुरुष)
शैक्षणिक पात्रता –
वैद्यकीय अधिकारी पदासाठी – MBBS + MCI/ MMC नोंदणी
स्टाफ नर्स पदासाठी – GNM/ B.Sc नर्सिंग + MNC नोंदणी
आरोग्य सेवक (पुरुष) पदासाठी – विज्ञान विषयात १२ वी पास + पॅरामेडिकल ट्रैनिंग कोर्स किंवा सॅनेटरी इन्स्पेक्टर कोर्स.
नोकरीचे ठिकाण – पुणे (महापालिका)
अर्ज करण्याचा पत्ता – इंटिग्रेटेड हेल्थ अँड फॅमिली वेल्फेअर सोसायटी फॉर पुणे म्युनिसिपल कॉर्पोरेशन, सर्व्हे नं. ७७०/३, बकरे अव्हेन्यू, गल्ली क्र. ७, कॉसमॉस बँकेच्या समोर, भांडारकर रोड, पुणे – ४११००५.
अर्ज शुल्क – पुणे महापालिका थेट इच्छुक उमेदवारांकडून अर्ज मागवून घेत आहेत त्यामुळे कोणतीही फी त्यांच्याकडून आकारली जात नाहीये.
अर्ज करण्याची अंतिम तारीख – 31 ऑक्टोबर 2023
अधिक माहितीसाठी इच्छुक उमेदवारांनी -https://www.pmc.gov.in/mr?main=marathi या संकेत स्थळावर भेट द्यावी….