परभणी प्रतिनिधी | गजानन घुंबरे
येलदरी जलाशयावर मच्छिमारी करणाऱ्या मच्छिमारांचे शोषण करणाऱ्या बामणी येथील एका मच्छिमार सहकारी सोसायटीच्या गैरव्यवहाराची चौकशी करुन ठेका रद्द करावा या मागणीसाठी लाल सेनेच्या वतीने परभणीतील जिल्हा मत्स्य अधिकारी यांच्या कार्यालयासमोर २ ऑगस्ट रोजी आंदोलन केलंय.
जिंतुर तालुक्यात येलदरी जलाशय असून सदरील जलाशय हजारो हेक्टरवर पसरलेले आहे. या जलाशयात करोडो रुपयांची जलसंपत्ती असून दरवर्षी पन्नास ते साठ कोटी रुपयांचा मत्स्य व्यवसाय होत असतो. करोडो रुपये किंमतीची जलसंपत्ती शासनाने केवळ तीन लाख रुपयात बामणी येथील स्व.राजीव गांधी मत्स्य व्यवसाय सहकारी संस्थेला निलाम केली आहे . असा आरोप करत यावेळी आंदोलकांनी निवेदन दिले आहे. राजीव गांधी संस्था म्हणजे केवळ काही कुटुंबांनी एकत्र येऊन नोंदणी केलेली संस्था असून त्यात खरे मच्छिमार नाहीत. असेही आंदोलकांचे म्हणने असुन येलदरी जलाशयाच्या परिसरातील जवळपास चाळीस गावातील हजारो कुटुंब जलाशयात मच्छिमारी करुन आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करतात.
अठरापगड जातीतील मच्छिमार अनेक वर्षापासून जलाशयावर पोट भरतात. अशा पारंपारिक मच्छिमाराला जलाशयात उतरण्यास संस्थेने मज्जाव केला आहे. त्यामुळे मच्छिमारांवर उपासमारीची वेळ आली आहे . मच्छिमारांच्या माल काट्यावर विक्रीसाठी आणल्यावर त्यांना दहा रुपये आणि वीस रुपये दराने मासे संस्थेला विकावी लागते. त्यामुळे आर्थिक पिळवणूक होत असल्याचे म्हणत हे आंदोलन करण्यात आले आहे.
ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News’.