हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । सध्या जगात पर्यायाने देशात आणि राज्यात कोरोनामुळे आर्थिक घसरण सुरु आहे. राज्यातील अनेक शेतकऱ्यांना मोफत कर्जवाटप शिल्लक आहे. राज्याच्या खजिन्यातील बरीचशी रक्कम कोरोना उपाययोजनांसाठी वापरण्यात आली असल्याने ही स्थिती निर्माण झाली आहे. सध्या शेतकऱ्यांचा पेरणीचा काळ आहे. यासाठी त्यांना पीक कर्जाची आवश्यकता असताना अनेक राष्ट्रीयकृत बँका शेतकऱ्यांना कर्ज देण्यासाठी टाळाटाळ करीत असल्याची बाब समोर येत आहे. हे अतिशय गंभीर असल्याचे सरकारने सांगितले आहे. आणि ज्या बँका कर्ज देणार नाहीत त्यांच्यावर फौजदारी गुन्हा दाखल केला जाईल असेही सांगण्यात आले आहे.
ज्या राष्ट्रीयकृत बँका कर्ज देणार नाहीत त्यांच्याबाबतीत ही गँभीर बाब समजून त्यांच्यावर फौजदारी गुन्हे दाखल करण्यात येतील असा इशारा राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी दिला आहे. “शेतकऱ्यांना सुलभतेने कर्ज मिळावे यासाठी राज्य शासन आग्रही आहे. यासाठी राज्य शासनाच्या वतीने देखील विशेष आदेश निर्गमित करण्यात आले आहेत. असे असतानाही अनेक राष्ट्रीयकृत बँका या शेतकऱ्यांना पीक कर्ज देण्यासाठी टाळाटाळ करीत असल्याच्या तक्रारी या प्राप्त होत आहे, ही अतिशय गंभीर बाब आहे. ज्या बँका पीक कर्ज देत नाही त्यांना वारंवार सूचना सुद्धा करण्यात येत आहेत असेही त्यांनी सांगितले आहे.
शेतकऱ्यांना पीक कर्ज देण्यासाठी टाळाटाळ करीत आहे अशा बँकांची तक्रार जिल्हाधिकारी यांनी दिली तर अडचणीच्या काळात शेतकऱ्यांची पिळवणूक करणाऱ्या बँकांवर कडक कारवाई करण्यात येईल,” अशी माहिती अनिल देशमुख यांनी दिली आहे. त्यामुळे आता ज्या बँका आता शेतकऱ्यांना कर्ज नाही म्हणतील त्यांना फौजदारी कारवाईला सामोरे जावे लागले आहे.
ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News’.