सातारा प्रतिनिधी। शुभम बोडके
राज्यात पश्चिम महाराष्ट्र आणि कोकणात मुसळधार पावसामुळे नागरिकांचे अतोनात नुकसान झाले आहे. या पार्शवभूमीवर आज केंद्रीयमंत्री रामदास आठवले यांनी सातारा जिल्ह्यातील नुकसानग्रस्त गावांना भेट दिली. यावेळी “दरड कोसळून होणारी जीवितहानी रोखण्यासाठी राज्य सरकारने तज्ज्ञांची अभ्यास समिती स्थापन करावी. त्या समितीद्वारे धोकादायक डोंगरांवरील गावांचे सर्वेक्षण करून धोकादायक ठिकाणच्या गावांचे सुरक्षितस्थळी पुनर्वसन करावे. नवीन गावे वसवावीत, अशी मागणी केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी केली.
महाड येथील दरड कोसळलेल्या तळीये या गावातील दुर्घटनास्थळी भेट दिल्यानंतर मंत्री रामदास आठवले यांनी आज सातारा जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे भूस्खलन, छत पडून, दरड कोसळलेल्या वाई, पाटण, महाबळेश्वर, सातारा, जावली तालुक्यातील गावांना भेट देऊन पाहणी केली. त्यानंतर त्यांनी सातारा येथे पत्रकार परिषद घेतली.
https://www.facebook.com/hellomaharashtra.in/videos/917215398858035/
यावेळी मंत्री आठवले म्हणाले कि, ” मोठ्या प्रमाणात अतिवृष्टी व केंद्र सरकारकडून दोन लाख तर राज्य सरकारकडून पाच लाखांची मदत मिळणार आहे. तळीये हे गाव अत्यंत उंचावर आहे. तेथे पुन्हा घरे बांधणे धोक्याचे होईल त्यामुळे म्हाडाने त्यांना अन्य सुरक्षित स्थळी घरे बांधून द्यावी. तसेच आपण पश्चिम महाराष्ट्रातील नुकसानीच्या भागाचीही पाहणी करणार आहे.
महाराष्ट्र सरकारनं राज्यातील डोंगर उतारावर धोकादायक ठिकाणी असलेली गावं, वस्त्यांचे पुनर्वसन करण्यासाठी समितीची नेमणूक करावी- केंद्रीय @MSJEGOI राज्य मंत्री @RamdasAthawale @Info_Satara pic.twitter.com/HhQGtIATW5
— PIB in Maharashtra 🇮🇳 (@PIBMumbai) July 26, 2021
आता कोयनानगर इथे जाऊन तेथील नुकसानीबाबत माहिती घेणार आहे. महाबळेश्वर, वाई, जावली अशा ठिकाणी मृत्यू झाले आहेत. अशा प्रकारे चारशेहून अधिक गावे बाधित झालेली आहे. त्या ठिकाणीही राज्य सरकारकडून मदत केली जावी, अशी आम्ही मागणी करीत आहोत.