सातारा प्रतिनिधी | शुभम बोडके
फलटण तालुक्यातील कोळकी येथील स्मशानभूमीत कोरोनाबाधितांवर अंत्यसंस्कार केल्यानंतर एक तरुण काहीतरी खात असल्याचा व्हिडिअो व्हायरल झाला होता. त्यानंतर त्या तरूणाला तेथून हाकलून लावत पोलिसांच्या ताब्यात दिले होते. आज त्याचे पूनर्वसन वाई तालुक्यातील वेळे येथील यशोधन संस्थेत करण्यात आले.
कोरोना रुग्णाचे मृतदेह जाळण्यासाठी कोळकी ग्रांमपंचायतची संमाशानभूमी घेतली आहे. या स्माशानभूमीत तरुण मुलगा जळत असणार्या सरणातून काढून काहीतरी खात असल्याचे निदर्शनास आले होते. त्याला नगर पालिकेच्या कर्मचार्यानी हटकले, परंतु त्याला लागलेल्या भुकेने तो व्याकुळ झाला होता. त्याला त्या ठिकाणाहून हटकुन पोलिसाच्या ताब्यात देण्यात आले. त्याचे कोविड काळात पुर्नवसन कोठे करायचे हा प्रश्न प्रशासनापुढे होता. मुख्याधिकाऱ्यांनी यशोधन ट्रस्टचे संचालक रवी बोडके यांचेशी संपर्क करत, त्याला यशोधन ट्रस्टमध्ये घेण्याची विनंती केली. रात्री उशीरा पोलिसांनी सर्व कागदपत्राची पुर्तेता केली. त्याची कोरोना चाचणीही करण्यात आली. यामध्ये ती निगेटिव्ह आली आहे.
पोलिस बदोबस्तामध्ये यशोधन ट्रस्टच्या वेळे येथील आश्रमात त्याची सोय करण्यात आली आहे. सकाळी कवठे आरोग्य केंद्रात त्याची वैद्यकिय तपासणी, कोरोनाची टेस्ट केली आहे. त्याच्यावर मानसोपचाराची गरज असून, लवकरच उपचारासाठी सातारा या ठिकाणी घेऊन जाणार असल्याची माहिती रवी बोडके यांनी दिली.