प्रेमात जात आलीच! आधी बनविले संबंध अन लग्नाची वेळ येताच म्हणे जात जुळत नाही

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

औरंगाबाद – असे म्हणतात की प्रेम जात, धर्म काही पहात नाही. परंतु अजुनही बऱ्याच ठिकाणी प्रेमात जात आडवी आल्याचे आपल्याला पहायला मिळते. अशीच एक घटना औरंगाबाद जिल्ह्यातील बिडकीण येथे उघडकीस आली आहे. स्पर्धा परिक्षाची तयारी करताना दोघे मुंबईत दोघांची भेट झाली. भेटीतून मैत्री झाली. पुढे हीच मैत्रीचे प्रेमामध्ये रूपांतर झाले. दोघांनी लग्नाच्या आणाभाका घेतल्या. दरम्यानच्या काळात दोघात शारीरिक संबंध घडले. तरुणीने लग्नाची मागणी करताच जात जुळत नसल्याचे कारण पुढे करीत तरुण मोकळा झाला. होकाराची वाट पाहून देखील काहीच उत्तर मिळत नसल्याने तरुणीने थेट पोलीस ठाणे गाठत घडलेल्या घटनेबाबत तक्रार दिली. या प्रकरणी बिडकीन पोलीस ठाण्यात बलात्कारासह अ‍ॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अविनाश नामदेव आहेर (रा.गणोरे ता.अकोले, जि.अहमदनगर, ह. मु. हरीकुंज सोसायटी, फारोळा फाटा, ता पैठण) असे गुन्हा दाखल झालेल्या तरुणाचे नाव आहे.

 

पोलिसांनी दिलेली अधिक माहिती अशी की, मूळ चंद्रपूर जिल्ह्यातील व सध्या पुणे येथे राहत असलेल्या एक 27 वर्षीय तरुणी आणि अविनाश शिक्षण पूर्ण झाल्यावर एमपीएससीची तयारी करताना मुंबईत भेटले. तेथे अभ्यासादरम्यान त्यांच्यात मैत्री झाली. व नंतर मैत्रीचे रूपांतर प्रेमात झाले. यातून त्यांच्यात  शारीरिक संबंध पण निर्माण झाले. अनेक वेळा आपण लग्न करू असे आश्वासन अविनाश पीडित तरुणीला द्यायचा.  2 जुलै 2021 ते 25 डिसेंबर 2021 या काळात त्याने नाशिक येथील हॉटेलमध्ये, फिर्यादीच्या सनसवाडी येथील राहत्या घरी तसेच हरीकुंज सोसायटी, फारोळा फाटा ता.पैठण येथील किरायाच्या घरात वारंवार शारीरिक संबंध प्रस्थापित केले. यानंतर फिर्यादी तरुणीने लग्नासाठी अविनाशकडे तगादा लावला, मात्र तो तिला टाळू लागला. त्यातच त्याने जातीचा उल्लेख करीत जातीमुळे आपण लग्न करू शकत नसल्याचे सांगून पीडितेला शिवीगाळ व मारहाण करून हाकलून दिले, असे त्या तरुणीने फिर्यादीत म्हटले आहे.

या तक्रारीवरून बिडकीन पोलिसांनी अनुसूचित जाती जमाती अत्याचार प्रतिबंधक अधिनियम सुधारणा 2015 अन्वये गुन्हा दाखल केला आहे.