बँक अथवा पोस्टातुन पैसे काढत आहात तर हे नियम लक्षात ठेवा; अथवा भरावा लागू शकतो जादाचा टॅक्स 

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । जर तुम्ही तुमच्या बँक अकॉउंट अथवा पोस्ट ऑफिस मधून जास्त पैसे काढत असला तर तुम्हाला टीडीएस भरावा लागू शकतो. आयकर विभागाने टीडीएस च्या नियमांमध्ये बदल केले आहेत. जे १ जुलै २०२० पासून लागू करण्यात आले आहेत. नुकत्याच जारी करण्यात आलेल्या सूचनांमध्ये केंद्रीय प्रत्यक्ष कर बोर्डाने टीडीएस फॉर्म मध्ये बदल झाल्याची माहिती दिली आहे. फायनान्स ऍक्ट २०२० अंतर्गत हा बदल करण्यात आला आहे. आयकर विभागाने फॉर्म २६Q  आणि २७Q चा फॉरमॅट रिवाइज करण्यात आला आहे. ज्यामध्ये विविध प्रकारच्या आवासीय देयावर टीडीएस कपातीवर आणि डिपॉझिटवर माहिती देण्यात आली आहे. यामध्ये गैर आवासीय देयावरील टीडीएस च्या संदर्भातही माहिती दिली आहे.

नियम ३१A मध्ये संशोधनानंतर टॅक्सपेयर्सनी जी रक्कम त्यांनी दिली आहे अथवा क्रेडिट केली आहे त्या रकमेच्या संदर्भातील माहिती देणे अनिवार्य झाले आहे. पण यावर टॅक्स कपात झाली आहे अथवा कमी टॅक्स कपात आहे हे सांगणे अनिवार्य असणार आहे. पहिल्या फॉर्मच्या तुलनेत हा फॉर्म अधिक व्यापक आहे असे तज्ञांचे म्हणणे आहे. यावर ज्या रकमेवर टीडीएस कापला आहे, या संदर्भात माहिती द्यावी लागेल. याशिवाय टॅक्सपेयर्स ना अशी रक्कम उघड करणे अनिवार्य असेल ज्यावर काही कारणाने टीडीएस कापला नाही आहे. कमी दरावर टीडीएस कापणे अथवा अजिबात टीडीएस न कापणे या विभिन्न स्थिती साठी विविध कोड उपलब्ध करून देण्यात आले आहेत.

१ जुलै पासून हा नियम लागू करण्यात आला आहे. मोठ्या प्रमाणात कॅश काढणाऱ्यांसाठी इन्कमटॅक्स रिटर्न ची लिंकही देण्यात आली आहे. यामध्ये कोणतीही बँक, सहकारी संस्था अथवा पोस्ट ऑफिस मधून कॅश काढणाऱ्यांचा समावेश करण्यात आला आहे. एखादी व्यक्ती मागच्या ३ वर्षातील इन्कम टॅक्स रिटर्न दाखल करत आहे आणि १ कोटी रु पर्यंत कॅश काढत आहे तर त्यांना कोणताच टॅक्स देण्याची गरज नाही आहे. पण जर कॅश १ कोटीपेक्षा अधिक असेल तर २% टीडीएस द्यावा लागेल. या नियमात असेही सांगितले आहे की, जर कुणी मागच्या तीन वर्षात इन्कमटॅक्स रिटर्न दाखल केला नसेल आणि दरवर्षी २० लाख रुपयांपर्यंत पैसे काढत असेल. तर त्याला टीडीएस द्यायचा नाही आहे. दुसरीकडे आयटीआर दाखल न करण्याच्या स्थितीमध्ये २० लाख २ रुपयापासून १ कोटी रुपयांपर्यंत कॅश काढण्यासाठी २% टॅक्स द्यावा लागेल. १ करोड पेक्षा अधिक कॅश काढण्यासाठी ५% टॅक्स द्यावा लागेल.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News”.

Leave a Comment