हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । Income tax : सध्या मार्च महिना सुरू आहे,ज्यामुळे करदात्यांकडून आपला इन्कम टॅक्स वाचवण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले जात आहेत. हे जाणून घ्या कि, आपला घरभाडे भत्ता (HRA) हा पगारदार लोकांसाठी कर वाचवण्यामध्ये सर्वात प्रभावी साधन आहे.याद्वारे कोणत्याही गुंतवणुकीशिवाय कर वाचवता येईल. मात्र याचा क्लेम करण्यासाठी आपल्याला भाडे करार करावा लागेल. ज्याशिवाय कर सवलतीचा लाभ मिळू शकणार नाही. जर आपणही फक्त कर कपात टाळण्यासाठी भाडे करार करणार असाल तर त्याच्याशी संबंधित काही खास गोष्टी लक्षात घ्या.
जुन्या टॅक्स सिस्टीम मध्येच मिळेल फायदा
इथे हे ध्यानात घ्या की, भाडे करार करून जुन्या टॅक्स सिस्टीममध्येच कर सवलतीचा लाभ घेता येईल. कारण नवीन टॅक्स सिस्टीममध्ये कोणत्याही प्रकारची कर सवलत रद्द करण्यात आली आहे. जुन्या रिजीममध्ये आयकर कायद्याच्या कलम 10(13A) अंतर्गत, HRA वर कर सवलत भाडे कराराद्वारे क्लेम करता येतो. मात्र आपल्या सॅलरी स्लिपमध्ये HRA किती दिला गेला आहे त्याच प्रमाणात कर सवलत मिळेल. Income tax
करारनाम्यात स्टॅम्पची विशेष काळजी घ्या
आपला भाडे करार करताना स्टॅम्पकडे विशेष लक्ष देण्याची गरज आहे. 100 किंवा 200 रुपयांच्या स्टॅम्पवर केलेला भाडे करार मिळवा. जर आपण वार्षिकरित्या 1 लाख रुपयांपेक्षा जास्त भाडे भरत असाल तर घरमालकाचे पॅन आणि आधार कार्ड द्यावे लागेल. तसेच कराराच्या प्रत्येक पानावर जमीनमालकाची स्वाक्षरी देखील घ्यावी लागेल. Income tax
करारामध्ये मासिक भाड्याचा उल्लेख असावा
भाडे करार करताना त्यामध्ये फक्त मासिक भाड्याची नोंद करावी. काही लोकं 6 महिन्यांसाठी किंवा वर्षभरासाठीचा भाडे करार करून घेतात. ज्यामुळे मासिक भाडे मोजण्यात अडचण येते. याशिवाय, क्लेम करताना प्रत्येक महिन्याच्या भाड्याची पावती देखील जोडली गेली पाहिजे. अन्यथा आपला क्लेम नाकारला जाऊ शकतो. Income tax
करारामध्ये याचा उल्लेख करा
आपण किती दिवसांपासून भाड्याच्या घरात राहत आहात, याचाही उल्लेख भाड्याच्या करारात करावा लागेल. साधारणपणे, लोकं एक वर्ष किंवा 11 महिन्यांसाठीचा करार करतात, जो पुढे वाढवता येतो. शक्यतो करार हा त्याच कालावधीचा असावा ज्यासाठी आपण कर सवलतीचा क्लेम करत आहात. Income tax
अधिक माहितीसाठी या वेबसाईटला भेट द्या : https://incometaxindia.gov.in/Pages/default.aspx
हे पण वाचा :
New Business Idea : शेतीबरोबरच ‘हा’ व्यवसाय सुरू करून दरमहा मिळवा लाखो रुपयांचे उत्पन्न
FD Rates : बँकेमध्ये FD करणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी, आता काही महिन्यातच पैसे होणार दुप्पट
Bank of Baroda च्या ग्राहकांनी लवकरात लवकर करा ‘हे’ काम, अन्यथा बंद होऊ शकेल खाते
Bank FD : ‘या’ 5 सरकारी बँका ज्येष्ठ नागरिकांना FD वर देत आहेत भरपूर व्याज, जाणून घ्या व्याजदर
Gold Price Today : सोन्या-चांदीच्या किंमती महागल्या, पहा आजचे नवीन भाव