मंदिरं खुली करण्यासाठी आंबेडकरांनंतर आता आठवले करणार आंदोलन

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

 मुंबई । रिपाइं नेते आणि केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले (ramdas athawale) यांनी धार्मिकस्थळं सुरू करण्यासाठी आंदोलन करण्याचा जाहीर केलं आहे. नागरिकांमध्ये कोरोनाबाबतची जनजागृती झालेली असल्यानेच मंदिरं सुरू करावी, असंही आठवले यांनी म्हटलं आहे.

वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांच्या मंदिर प्रवेश आंदोलनाला यश मिळाल्यानंतर आता रामदास आठवले यांनी धार्मिकस्थळं सुरू करण्यासाठी आंदोलनाची हाक दिली आहे. ८ सप्टेंबरपर्यंत धार्मिकस्थळं सुरू न केल्यास ९ सप्टेंबररोजी देशव्यापी आंदोलन करण्यात येईल, असा इशारा रामदास आठवले यांनी दिला आहे.

करोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी लॉकडाऊनमध्ये सर्व धर्मीय प्रार्थनास्थळे बंद करण्यात आली. आता मात्र अनलॉक सुरू झाले आहे. करोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी जनतेत प्रबोधन झाले असल्यामुळे पुरेशी खबरदारी घेऊन सुरक्षेचे नियम पाळून येत्या ८ सप्टेंबरपर्यंत मंदिर, मस्जिद, चर्च, बुद्धविहार, गुरुद्वारा आणि देरासार अशी सर्व धर्मीय प्रार्थनास्थळे सुरू करावीत अन्यथा ९ सप्टेंबर रोजी रिपब्लिकन पक्षातर्फे देशभर आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा रामदास आठवले यांनी दिला आहे. दरम्यान, राज्यातील मंदिरं सुरू करण्यासाठी प्रकाश आंबेडकर यांनी पंढपूरच्या विठ्ठल मंदिरात प्रवेश करण्याच्या आंदोलनाची हाक दिली होती.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7875002893 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News”.