हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन : दिल्लीत राष्ट्रपती भवन येथे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सरकारच्या मंत्रिमंडळाचा विस्तार पार पडला. यावेळी काही जेष्टनेत्यांना आपल्या पदांचा राजीनामाही द्यावा लागला.यामध्ये प्रकाश जावडेकर, रविशंकर प्रसाद, डॉ. हर्षवर्धन, रेल्वेमंत्री पियुष गोयल यांच्यासह काही नेत्यांचा समावेश आहे. यावरून काँग्रेसनेते कीर्ती आझाद यांनी मोदी सरकारवर टीका केली आहे. “इंजिनमध्ये बिघाड झालळा होता. त्यामुळे इंजिन खराबही झाले आणि डब्बे बदलले गेले,” अशा शब्दात आझाद यांनी टीका केली आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मंत्रिमंडळ विस्तारावरून आता काँग्रेसकडून जोरदार टीका हाऊ लागली आहे. मोदी सरकारच्या केंद्रीय मंत्रिमंडळाचा बुधवारी विस्तार होऊन 43 मंत्र्यांचा राष्ट्रपती भवनमध्ये शपथविधी झाला. त्यामध्ये महाराष्ट्रातील 4 नेत्यांना मंत्रीमंडळात स्थान देण्यात आले असून रेल्वेमंत्री पियुष गोयल यांना डच्चू देण्यात आला असल्याने गोयल यांच्या राजीनाम्यावरून काँग्रेसने मोठी सरकारवर हल्लाबोल केला आहे.
ख़राबी इंजन में थी
और बदले डिब्बे गए
केंद्रीय मंत्रिमंडल— Kirti Azad (@KirtiAzaad) July 8, 2021
मोदींच्या मंत्रिमंडळाच्या विस्तारावरून काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी काल मोदी सरकारवर हल्लाबोल केला होता. “केंद्रात असलेल्या मोदी सरकारने गेली सात वर्षे फक्त एन्जॉय करण्याचं काम केलं आहे. त्यांनी त्यांच्याकडे असलेल्या सत्तेचा आनंद फक्त उपभोगण्याचे काम केले आहे.,” अशा शब्दात पटोले यांनी टीका केली होती. त्यांच्यानंतर आता काँग्रेसचे नेते किर्ती आझाद यांनी मोदी सरकारवर टीका केली आहे.