हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । Repo Rate : RBI पुन्हा रेपो दरात वाढ करण्यात आली आहे. यानंतर आता बँकांनीही आपल्या कर्जाच्या व्याजदरात वाढ करण्यास सुरुवात केली आहे. ज्यामुळे पंजाब नॅशनल बँक, बँक ऑफ बडोदा आणि बँक ऑफ इंडिया ने रेपो-आधारित कर्जदरात वाढ केली आहे.
पंजाब नॅशनल बँक
सार्वजनिक क्षेत्रातील बँक असलेल्या पंजाब नॅशनल बँकेने (PNB) आपल्या रेपो आधारित कर्जदरात 0.50 टक्क्यांनी वाढ केली आहे. बँकेने कर्जाचा व्याजदर 6.9 टक्क्यांवरून 7.4 टक्के केला आहे. बँकेचे वाढलेले दर 9 जून 2022 पासून लागू झाले आहेत. Repo Rate
बँक ऑफ बडोदा
सार्वजनिक क्षेत्रातील आणखी एक बँक असलेल्या बँक ऑफ बडोदाने BRLLR 7.40 टक्क्यांपर्यंत कमी केला आहे. हे नवीन दर 9 जूनपासून लागू करण्यात आले आहेत. Repo Rate
बँक ऑफ इंडिया
सार्वजनिक क्षेत्रातील बँक ऑफ इंडियाने कर्जावरील व्याजदर 7.25 टक्क्यांवरून 7.75 टक्के केला आहे. बँकेचे नवे व्याजदर 8 जूनपासून लागू झाले आहेत. Repo Rate
RBIकडून रेपो दरात दुसऱ्यांदा वाढ करण्यात आली
8 जून 2022 रोजी, RBI गव्हर्नर शक्तीकांत दास यांनी रेपो दरात 50 बेस पॉईंट्सची वाढ जाहीर केली. यामुळे आता रेपो दर 4.40 टक्क्यांवरून 4.90 टक्के झाला आहे. यापूर्वी, 4 मे 2022 रोजी देखील RBI ने रेपो दरात 40 बेस पॉईंट्सनी वाढ केली होती. ज्यामुळे रेपो दर 4.00 टक्क्यांवरून 4.40 टक्क्यांवर आला होता. Repo Rate
अधिक माहितीसाठी या वेबसाईटला भेट द्या : https://www.pnbindia.in/interst-rate-on-advances-linked-to-mclr.html
हे पण वाचा :
Credit Card वापरणाऱ्यांनी चुकूनही करू नयेत ‘या’ चुका, अन्यथा होईल मोठे नुकसान
Bank Strike : 27 जून रोजी बँक कर्मचारी पुकारणार संप, सलग 3 दिवस बँका राहणार बंद
Gold Price Today : सोन्यामध्ये तेजी तर चांदीही वधारली, आजचे दर जाणून घ्या
आता सहकारी बँकांकडून घेता येणार 1.40 कोटी रुपयांपर्यंतचे Home Loan, RBI ने वाढवली मर्यादा
Google Pay वर आता वापरता येणार Hinglish भाषा, कसे ते जाणून घ्या