हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । Repo Rate : RBI च्या चलनविषयक धोरण समितीकडून आज (30 सप्टेंबर रोजी) रेपो दरात 0.5 टक्क्यांनी वाढ करण्यात आली आहे. त्यानंतर तो 5.9 टक्के झाला आहे. हे लक्षात घ्या कि, चालू आर्थिक वर्षात रेपो दरामध्ये सलग चौथ्यांदा वाढ करण्यात आली आहे. याआधीदेखील ऑगस्टमध्ये रेपो दरात 50 बेसिस पॉईंटची वाढ करण्यात आली होती. त्यावेळी व्याजदर 4.90 टक्क्यांवरून 5.40 टक्के करण्यात आला होता. या दर वाढीचा परिणाम थेट सर्वसामान्यांवर होणार आहे. कारण यानंतर आता बँकाकडून आपल्या व्याजदरात केली जाईल. त्यामुळे बँकेचे कर्ज महागतील. Repo Rate
रेपो दर म्हणजे काय ते समजून घ्या
ज्या दराने RBI कडून देशातील सरकारी आणि खाजगी बँकांसहित नॉन-बँकिंग फायनान्स कंपन्यांना निधी पुरवला जातो त्या दराला रेपो दर असे म्हंटले जाते. हा रेपो दर वाढवल्याचा परिणाम हा थेट सर्वसामान्यांवर होतो. यामुळे बँकेचे कर्ज महागते. चला तर मग आज रेपो दर वाढवल्याचा एज्युकेशन आणि पर्सनल लोनवर कसा परिणाम होतो ते समजून घेउयात… Repo Rate
एज्युकेशन लोनवर कसा परिणाम होईल ???
जेव्हा आपण शिक्षणासाठी एखादी बँक किंवा फायनान्स कंपनीकडून लोन घेतो तेव्हा त्याला एज्युकेशन लोन असे म्हणतात. हे फ्लोटिंग रेट रिटेल लोनच्या स्वरूपात मंजूर केले जातात, जे एक्सटर्नल बेंचमार्कशी जोडले गेलेले असतात. याचा अर्थ कोर्स, सिव्हिल स्कोअर यांसारख्या कारणांमुळे बँकेकडून कर्जाचा व्याजदर कमी-जास्त असू शकतो. हे लक्षात घ्या कि, बहुतेक बँकांसाठी हा एक्सटर्नल बेंचमार्क रेपो दर आहे. RBI कडून नुकत्याच केलेल्या दर वाढीमुळे एज्युकेशन लोन थेट महागणार आहे. रेपो रेट 0.50 टक्क्यांनी वाढल्याने आता कर्ज घेणेही तितकेच महागणार आहे. याशिवाय आधीच चालू असलेल्या कर्जावरील व्याजातही वाढ होणार आहे. Repo Rate
पर्सनल लोन वर कसा परिणाम होईल ???
पर्सनल लोन देखील फ्लोटिंग रेट रिटेल लोन म्हणून मंजूर केले जातात. सार्वजनिक क्षेत्रातील बँकांकडून सहसा फ्लोटिंग दरांवर आधारित पर्सनल लोन देतात तर बहुतेक खाजगी बँका निश्चित व्याज दराने पर्सनल लोन देतात. त्यामुळे, पर्सनल लोन फ्लोटिंग दरांवर आधारित असल्यास ते इतर EMI च्या तुलनेतही वाढेल. Repo Rate
अधिक माहितीसाठी ‘या’ वेबसाईटला भेट द्या : https://www.bajajfinserv.in/personal-loan
हे पण वाचा :
Senior Citizen Saving Scheme च्या व्याजदरात बदल, नवीन दर तपासा
Repo Rate वाढल्यामुळे कर्ज महागणार तर FD वर मिळणार जास्त व्याज !!! कसे ते जाणून घ्या
Sukanya Samriddhi Yojana म्हणजे काय ??? त्यावरील व्याजदर जाणून घ्या
RBI कडून रेपो दरात सलग चौथ्यांदा वाढ, आता कर्जे आणखी महागणार
Gold Price Today : सोन्या-चांदीच्या किंमतीत आज झाली वाढ, पाहा ताजे दर