रिझर्व्ह बँकेचं पतधोरण जाहीर; पुढील २ महिन्यांसाठी रेपो रेट जैसे थे!

0
47
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन । वर्ष २०२०-२१ साठीचा अर्थसंकल्प नुकताच सादर झाल्यानंतर रिझर्व्ह बँकेनेही पुढील कालावधीसाठीचं आपलं पतधोरण जाहीर केलं आहे. आरबीआयच्या पतधोरण आढावा समितीनं पुढील दोन महिन्यांसाठी रेपो रेट ५.१५ टक्केच ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. सलग दुसऱ्यांदा रिझर्व्ह बँकेनं रेपो रेट कायम ठेवण्याची भूमिका घेतली आहे.

रिझर्व्ह बँकेच्या पतधोरण आढावा समितीची मंगळवारपासून द्विमासिक पतधोरण बैठक सुरू होती. पुढील महिन्यांसाठी रिझर्व्ह बँक काय धोरण अवलंबणार याकडे आर्थिक जगताचं लक्ष लागलं होतं. या बैठकीत पतधोरण आढावा समितीच्या सर्व सहा सदस्यांनी रेपो रेट कायम ठेवण्याची भूमिका घेतली. किरकोळ वाढती महागाई आणि अर्थव्यवस्थेची बिकट अवस्था या पार्श्वभूमीवर आरबीआयनं रेपो रेट ५.१५ टक्के कायम ठेवला आहे. त्यामुळे कर्जदारांना आहे त्याच व्याजदरानं कर्जाची परतफेड करावी लागणार आहे. २०२०-२१ या वर्षात जीडीपी ६ टक्के राहणार असल्याचं अंदाज रिझर्व्ह बँकेनं व्यक्त केला आहे.

दिवसभरातील ताज्या बातम्या तुमच्या मोबाईलवर मोफत मिळवण्यासाठी ”Hello News” टाईप करून 8080944419 या नंबरवर Whatsapp करा.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here