पृथ्वीराज चव्हाणांच्या खांद्यावर काॅंग्रेसकडून तीन राज्यांच्या प्रचार रणनीतीची जबाबदारी

0
74
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

कराड प्रतिनिधी सकलेन मुलाणी

देशात पाच राज्यांच्या निवडणुकीचे बिगुल वाजले असून या पाचही राज्यात काँग्रेस पक्ष मोठ्या तयारीने उतरलेला दिसून येत आहे. काँग्रेस पक्षाने पक्षाचे जेष्ठ नेते महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आ. पृथ्वीराज चव्हाण यांच्याकडे या पाच राज्यांपैकी तीन राज्यांच्या प्रचार रणनीतीची जबाबदारी सोपवली आहे.

काँग्रेस पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षा सोनिया गांधी यांच्या सूचनेनुसार हा निर्णय झाला असून माजी मुख्यमंत्री आ. पृथ्वीराज चव्हाण हे उत्तरप्रदेशची राजधानी असलेल्या लखनऊला रवाना झाले आहेत. तिथे त्यांच्या पत्रकार परिषदा होणार असून प्रचार यंत्रणेत सुद्धा ते सहभागी असणार आहेत. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर निवडणूक आयोगाने व्हर्चुअल पद्धतीने प्रचार यंत्रणेला परवानगी दिली आहे. त्याप्रमाणे सर्व पक्षांचा प्रचार या पाचही राज्यात सुरु आहे. व्हर्चुअल प्रचार तसेच पत्रकार परिषदा अश्या काही तंत्रानुसार प्रचार सुरु आहे.

यानुसार तीन राज्यांमध्ये पत्रकार परिषदा घेऊन काँग्रेस पक्षाची भूमिका मांडण्याचे महत्वपूर्ण काम काँग्रेस पक्षाने पृथ्वीराज चव्हाण यांच्यावर सोपविले आहे. आ. चव्हाण उत्तरप्रदेश, उत्तराखंड व गोवा या राज्यांमध्ये पत्रकार परिषदा घेऊन पक्षाची भूमिका मांडणार आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here