Rishabh Pant Accident : मोठी अपडेट!! पुढील उपचारासाठी पंतला मुंबईला हलवणार

Rishabh Pant Accident
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । कार अपघातात जखमी झालेला क्रिकेटपटू ऋषभ पंतला (Rishabh Pant Accident) पुढील उपचारासाठी मुंबईला हलवण्यात येणार आहे. दिल्ली आणि जिल्हा क्रिकेट असोसिएशनचे (डीडीसीए) संचालक श्याम सुंदर यांनी याबाबत माहिती दिली आहे. ३० डिसेंबर रोजी पंतचा अपघात झाला होता. या अपघातात ऋषभ थोडक्यात बचावला असून त्याच्या पायाला डोक्याला आणि पाठीला मार लागला आहे.

पंतला पुढील उपचारांसाठी बुधवारी मुंबईला हलवले जाईल. मुंबईत त्याच्या गुडघा (Rishabh Pant Accident) आणि घोट्याच्या दुखापतींवर उपचार केले जातील. पंतच्या गुडघ्याचा लिगामेंट फाटला आहे आणि त्याच्या उजव्या मनगटावर, घोट्याला आणि पायाच्या बोटाला दुखापत झाली आहे. मुंबईत भारतीय क्रिकेट नियामक मंडळाच्या (बीसीसीआय) वैद्यकीय पथकाच्या देखरेखीखाली ऋषभ पंत वर उपचार केले जात आहेत. पंतच्या लिगामेंट उपचाराची जबाबदारी बीसीसीआयने स्वत:वर घेतली आहे. बीसीसीआयने आश्वासन दिले की पंतला या वेदनादायक टप्प्यातून बाहेर येण्यासाठी सर्व वैद्यकीय सेवा आणि सर्व शक्य तेवढी मदत मिळेल.

ऋषभ पंत हा प्रसिद्ध क्रीडा ऑर्थोपेडिक डॉ. दिनशॉ पार्डीवाला यांच्या देखरेखीखाली असेल अशीही माहिती समोर येत आहे. ज्यांना बीसीसीआयच्या यादीत समावेश करण्यात आले आहे. ३० डिसेंबर ला ऋषभ पंतच्या भरधाव गाडीचा अपघात झाला होता. आहे अपघात इतका भीषण होता कि, पंतच्या गाडीला आग लागली. या अपघातात ऋषभ पंत थोडक्यात बचावला.