हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । भारताचा स्टार क्रिकेटपटू ऋषभ पंत (Rishabh Pant Accident) याच्या गाडीचा आज भीषण अपघात झाला. पहाटे 5:30 वाजता हा अपघात झाला असून यामध्ये पंतच्या गाडीला आग लागून कारचा अक्षरशः चक्काचूर झाला आहे. ऋषभला डेहराडूनच्या मॅक्स हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी आणण्यात आले आहे. पंतचा अपघात नेमका कसा झाला याचे फोटो पाहताच तुमच्या अंगावर काटा आल्याशिवाय राहणार नाही.
ऋषभ पंत (Rishabh Pant) दिल्लीहून घरी परतत असताना पहाटे 5:30 वाजता हा अपघात झाला. कारमध्ये ऋषभ एकटाच होता, तो स्वतः गाडी चालवत होता.
पंतची कार भरधाव वेगात होती आणि बाजूला असलेल्या मजबूत लोखंडी रेलिंगला धडकली. यानंतर कारने पेट घेतला आणि गाडी उलटली. मोठ्या कष्टाने आग आटोक्यात आणण्यात आली. मात्र यावेळी गाडीचा अक्षरशः चक्काचूर झाला.
माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळ गाठून ऋषभ पंतला नरसनपासून रुरकीच्या दिशेने सुमारे आठ किलोमीटर अंतरावर असलेल्या सक्षम हॉस्पिटलमध्ये नेले. रुग्णालयात दाखल करताना पंतची ऋषभ पंतची प्रकृती थोडी गंभीर होती, पण जसजसा वेळ निघून गेला तसतशी त्याची प्रकृती सुधारू लागली.
डॉक्टरांनी दिलेल्या माहितीनुसार, ऋषभ पंतच्या कपाळावर आणि पायाला दुखापत झाली आहे. यांनतर पंतची प्लास्टिक सर्जरी होण्याची शक्यता असून इथून पुढे तो बराच काळ मैदानापासून दूर राहू शकतो.
गुडघेदुखीचा कारणाने ऋषभ पंतला श्रीलंकेविरुद्धच्या आगामी मालिकेसाठी वगळण्यात आले होते. त्यातच आता पायाला दुखापत झाल्याने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये कमबॅक करणं पंतसाठी आव्हानात्मक असेल.