रितेश-जिनिलियाचं चाहत्यांना गिफ़्ट!! ‘व्हॅलेंटाईन डे’ निमित्त ‘वेड’ बघा फक्त 99 रुपयात; कुठे पाहू शकाल?

riteish deshmukh announced that ved movie screened for 99 rupees
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । अभिनेता रितेश आणि जिनिलिया देशमुख यांच्या ‘वेड’ ने बॉक्स ऑफिसवर जबरदस्त कमाई केली. या चित्रपटाने प्रेक्षकांसह सर्वांना अक्षरशः वेड लावले. या सिनेमाने आतापर्यंत एकूण 70 कोटींपेक्षा जास्त कमाई केली असून भरभरून यश मिळाल्यानंतर रितेश आणि जिनिलियाने त्यांच्या चाहत्यांसाठी व्हेलेंटाईन डे निम्मित खास गिफ़्ट दिलं आहे. त्यांनी व्हेलेंटाईन डे निम्मित फक्त 99 रुपयांत चित्रपट दाखवण्यात येईल, अशी मोठी घोषणा केली आहे.

https://www.instagram.com/p/CojU0uXNxqm/?utm_source=ig_web_copy_link

रितेश व जिनिलिया यांच्याकडून इंट्राग्रामच्या माध्यमातून नुकतीच घोषणा करण्यात आली आहे. महाराष्ट्रभरातील थिएटरमध्ये एकाच किमतीत हा सिनेमा दाखवण्यात येईल,असे रितेशने म्हंटले आहे. उद्या दि. 13 ते 16 फेब्रुवारीदरम्यान ‘वेड’ सिनेमा 99 रुपयांत महाराष्ट्रभरातील थिएटर्समध्ये दाखवण्यात येईल. हे खास ‘व्हॅलेंटाइन स्पेशल गिफ्ट’ असल्याचे रितेशने पोस्टमध्ये म्हटलं आहे.

https://www.instagram.com/reel/Cma5FGyBW2E/?utm_source=ig_web_copy_link

रितेश आणि जिनिलिया यांचा ‘वेड’ हा 30 डिसेंबर रोजी प्रदर्शित झाला. या चित्रपटाने एकूण 70 कोटींचा आकडा पार केला. मराठीमध्ये सर्वाधिक कमाई करणारा हा दुसरा सिनेमा ठरला.

https://www.instagram.com/reel/Cmqu5VMBOFF/?utm_source=ig_web_copy_link

प्रेक्षकांनी या चित्रपटाला अक्षरशः डोक्यावर घेतले. विशेष म्हणजे यातील ‘मला वेड लावलंय लावलंय…’ हे गाणे प्रत्येकाच्या तोंडी उमटत आहे. अनेकजण यावर रिल्स देखील बनवू लागले आहेत.