Pune News : पुढील 2 महिने भिडे पुलाजवळील रस्ते वाहतूकीसाठी बंद; हे असतील पर्यायी मार्ग

Bhide bridge
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन| पुणेकरांसाठी वाहतुकी संदर्भात एक मोठी माहिती समोर आली आहे. पुढील दोन महिने डेक्कन बसस्थानक ते भिडे पुलाजवळील रस्ता बंद राहणार आहे. या मार्गांवर पुणे महापालिकेकडून रस्त्यांची कामे करण्यात येणार असल्यामुळे भिडे पुलाजवळील वाहतूक सेवा बंद ठेवण्यात येणार आहे. मात्र यासाठी पुणेकरांना पर्यायी वाहतूक मार्ग ही उपलब्ध करून देण्यात आले आहेत. त्यामुळे पुढील दोन महिने पुणेकरांनी पर्यायी वाहतूक मार्गाचाच अवलंब करावा असे आवाहन वाहतूक विभागाकडून करण्यात आले आहे.

या पर्यायी वाहतूक मार्गाचा अवलंब करावा

– केळकर रस्त्यावरून जंगली महाराज रस्त्याकडे जाणाऱ्यांनी आणि नारायण पेठेकडे येणाऱ्यांनी गाडगीळ(झेड ब्रीज ) पुलाचा वापर करावा.

– भिडे पूल, सुकांता हाॅटेल, खाऊ गल्लीमार्गे जंगली महाराज रस्त्याने नागरिकांनी इच्छितस्थळी जावे.

– तसेच केळकर रस्तामार्गे डेक्कन जिमखान्याकडे जाणाऱ्यांनी देखील पर्यायी मार्गाचा वापर अवलंब करावा.

डेक्कन स्थानक ते भिडे पुलापर्यंत रस्त्याची कामे सुरू

दरम्यान, दिवाळीच्या अगोदर पुणे महापालिकेकडून रस्त्यांची कामे सुरू करण्यात आली आहेत. तसेच सध्या पुण्यात मेट्रोचे देखील काम सुरू आहे. त्यामुळे पुणेकरांना वाहतूक कोंडीचा सामना करावा लागत आहे. यात आता कामानिमित्त भिडे पूलजवळील मार्ग ठेवण्याचा निर्णय देखील वाहतूक विभागाकडून घेण्यात आला आहे. डेक्कन जिमखाना येथील पीएमपी स्थानक ते भिडे पूल रस्त्यावर पावसाळी वाहिनी टाकण्याचे सोमवार पासून सुरू होणार आहे. त्यामुळे गरज भासल्यास पुढे केळकर रस्तामार्गे भिडे पुलावरुन डेक्कन जिमखान्याकडे जाणारी वाहतूक बंद ठेवली जाईल.