खडसे, मुंडे, तावडे, बावनकुळे या ओबीसी नेत्यांचा राजकीय बळी का घेतला? रोहिणी खडसेंचा सवाल

rohini khadase
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावरुन राज्यातील राजकीय वातावरण चांगलंच तापल्याचं पाहायला मिळत आहे. ओबीसी आरक्षणासाठी राज्यभरात ठीकठिकाणी भाजपकडून आज अर्थात 26 जून रोजी राज्यभर चक्काजाम आंदोलन करण्यात येत आहे.याच पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसचे नेत्या रोहिणी खडसे यांनी भाजपवर निशाणा साधला आहे.

रोहिणी खडसे यांनी याबद्दल ट्विट करत म्हंटल की ते आंदोलन करतांना मा. खडसे, मुंडे, तावडे, बावनकुळे या ओबीसी आणि बहुजन नेत्यांचा राजकीय बळी का घेतला? हे पण सांगा ना..असा सवाल यावेळी रोहिणी खडसे यांनी केला.

तसेच त्यांनी अजून एक ट्विट करत म्हंटल की, आदरणीय फडणवीस साहेब. तुम्ही ओबीसी आरक्षणाचा अध्यादेश काढल्यानंतर 1/8/2019 रोजी तसेच दि. 18/9/2019 रोजी राज्य सरकारकडून केंद्राकडे इंपिरिकल डाटा मागितला होता ना? तो मिळाला नाही. खरंतर तेव्हाच अध्यादेशाद्वारा केलेले आरक्षणातील बदल टिकणार नाही, हे तुम्हाला माहित व्हायला हवे होते.