हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे मेहुणे श्रीधर पाटणकर यांच्यावर ईडीने केलेल्या कारवाईवरून राज्यातील राजकीय वातावरण सध्या चांगलेच तापले आहे. यावरून राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांनी भाजपवर हल्लाबोल केला आहे. “कितीही इडीच्या कारवाया करा, काही लोकांचे म्हणने आहे की या कारवायांचे कागदपत्र २०१७ रोजीच दिल्लीत गोळा झाले. असे असतानाही शिवसेनेने मविआत येण्याचा धाडसी निर्णय घेतला. महाराष्ट्र कधीही दिल्लीसमोर झूकला नाही. इडी आणि एजन्सीचा जो मारा होतोय ते पाहून लोक शांत बसणार नाही. कितीही मारा, हल्ला करा, मविआचा आमचा किल्ला मजबूत आहे, असे पवार यांनी म्हंटले.
रोहित पवार यांनी आज माध्यमांशी संवाद साधला. यावेळी ते म्हणाले की, महाराष्ट्रात सध्या ईडीच्यातर्फे कारवाया केल्या जात आहेत. इतर राज्यातील ईडीच्या कारवाईचा आकडा पाहता. 1600 पेक्षा जास्त केसेस झाल्या आहेत. पण ९ निकाली लागल्या. राजकीय फायदा होईल, पक्ष घाबरेल म्हणून कारवाई केली जात आहे.
मविआचे सर्व घटक पक्ष आहेत त्यांना विचारलं तर आम्हाला निवडणुका नकोत असे ते सांगतायत. मात्र, भाजपला सरकार चालताना बघावत नाही. म्हणून ते सरकार पाडण्यासाठी ताकत लावत आहे. ते अजून अडीच वर्ष हेच करणार आहेत. राज्यात चर्चा आहे की जलयुक्त घोटाळा, टिईटी घोटाळा, नोकरभरती घोटाळ्यात काय घडले? याबद्दलही सत्य जनतेसमोर यायला हवं. लोक विचारत आहेत याची उत्तरे का मिळत नाहीत. मग काय सत्य आहे ते ऊघड व्हायला हवं ही लोकांची भावना आहे, असे पवार यांनी म्हंटले.