अजितदादांच्या स्पष्टवक्तेपणामुळे भाजपची अडचण होत असणार म्हणून …; रोहित पवारांचे ट्विट चर्चेत

0
49
Rohit Pawar
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | पुण्यातील देहू येथील शिळा मंदिराच्या लोकार्पण सोहळा पंतप्रधान मोदींच्या हस्ते पार पडला. यावेळी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भाषणे झाली मात्र तिथे उपस्थित असलेले उपमुख्यमंत्री अजित पवार यांना मात्र भाषणाची संधीच न दिल्याने नव्या वादाला तोंड फुटले. याचवरून राष्ट्रवादी कॉंग्रेसचे आमदार रोहित पवार यांनी ट्विट करत भाजपवर निशाणा साधला आहे.

छत्रपतींचा तसेच क्रांतीज्योतींचा अपमान करणाऱ्या राज्यपालांना पंतप्रधान साहेबांसमोर खडे बोल सुनावणाऱ्या अजितदादांच्या स्पष्टवक्तेपणामुळे भाजपची नक्कीच अडचण होत असणार म्हणून कदाचित भाजपने आजच्या कार्यक्रमात अजित दादांना बोलू दिले नाही असा आरोप रोहित पवारांनी केला.

वारकऱ्यांच्या कार्यक्रमात सर्व भेद, द्वेष, अहंकार विसरून सहभागी व्हायचे असते. परंतु अहंकाराच्या आहारी गेलेल्या प्रदेश भाजपच्या नेत्यांकडून ही अपेक्षा करणे व्यर्थ आहे. अहंकाराबद्दल संतश्रेष्ठ तुकाराम महाराज म्हणतात अहंकार हा आत्मनाश घडवितो, माणसाला सत्यापर्यंत पोचू देत नाही

अहंकारी मनुष्य ‘आपण मोठे आहोत’ अशी भावना डोक्यात धरून गुरगुरत राहतो आणि असंच काहीसं आज प्रदेश भाजप नेत्यांचं झालं असावं. असो संत तुकोबारायांच्या दर्शनाने नक्कीच सर्वांना सद्बुद्धी प्राप्त होईल, अशी अपेक्षा! असा सणसणीत टोला रोहित पवारांनी भाजपाला लगावला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here